शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केस वाढतील भराभर, त्वचाही होईल सुंदर- तुकतुकीत, बघा कसा करायचा खोबरेल तेलाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2024 5:53 PM

1 / 8
२ सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड कोकोनट डे (World Coconut Day 2024) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आता खोबरेल तेलाचे त्वचेसाठी नेमके काय फायदे होतात ते पाहूया.
2 / 8
बहुतांश लोक वर्षांनुवर्षांपासून खोबरेल तेल वापरतात. पण तरीही त्याचा केसांसाठी आणि त्वचेसाठी कसा फायदा होऊ शकतो, हे आपल्याला माहिती नसते.
3 / 8
म्हणूनच आता त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यापासून ते केस छान लांब वाढण्यापर्यंत वेगवेगळ्या सौंदर्योपचारांसाठी खोबरेल तेलाचा कसा वापर करायचा ते पाहा..
4 / 8
डोळ्यांभोवतीचे डार्क सर्कल्स काढून टाकण्यासाठी खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल एकत्र करा आणि डोळ्यांभोवती लावा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात.
5 / 8
ओठ काळपट पडलेले असतील तर खोबरेल तेलामध्ये कॉफी मिक्स करा आणि त्याने ओठांना मसाज करा. दोन ते तीन मिनिटांनंतर ओठ धुवून टाका. नियमितपणे केल्यास ओठांना छान गुलाबी रंग येईल.
6 / 8
केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्त्याची पावडर एकत्र करून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. केस छान वाढतील.
7 / 8
मान, गळा काळपट झाला असेल तर खोबरेल तेलामध्ये लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण काळपट पडलेल्या मानेवर, गळ्यावर लावा. एक ते दोन मिनिटे मालिश करा. त्यानंतर धुवून टाका.
8 / 8
दातांना पिवळटपणा आला असेल तर खोबरेल तेल आणि लवंग पावडर एकत्र करून त्याने दात घासा. यामुळे दात पांढरेशुभ्र तर होतीलच. पण दातांची ठणक कमी करण्यासाठीही मदत होईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी