world poha day 2024, famous types of poha, different types of pohe, how to make pohe
जागतिक पोहे दिवस: गरमागरम कांदेपोहे- झणझणीत तर्रीपोहे, पाहा पोह्याचे प्रकार- तुम्हाला यापैकी कोणता आवडतो? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 12:19 PM1 / 8गरमगरम कांदे पोहे नाश्त्याला असले की दुसरं आणखी काय पाहिजे.. बहुसंख्य लोकांना अतिशय आवडणारा हा पदार्थ. अगदी लहान मुलंही पोहे पाहून खूश होतात. त्याच पोह्यांच्या प्रेमापोटी ७ जून हा दिवस जागतिक पाेहे दिवस म्हणून ओळखला जातो.2 / 8पोह्यांचे कितीतरी वेगळे प्रकार आहे. त्यातला सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे कांदेपोहे (kande pohe).. गरमागरम कांद्यापोह्यांचे नाव जरी घेतलं तरी त्याचा सुगंध पोहेप्रेमींच्या नाकात दरवळू लागतो. 3 / 8उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून खाल्ला जाणारा पोह्यांचा एक प्रकार म्हणजे दही पोहे (dahi pohe). पोटाला आणि मनाला थंडावा देण्याचं काम दही पोहे हमखास करतात. 4 / 8दडपे पाेहे हा पाेह्यांचा आणखी एक चवदार प्रकार. ही रेसिपी मुळची कोकणातली. पण आता मात्र ती अख्ख्या महाराष्ट्रातच आवडीने खाल्ली जाते. (dadpe pohe)5 / 8नागपुरी तर्री पोह्यांची तर बातच न्यारी. पोहे आणि त्यावर लालजर्द, झणझणीत तर्री.. अशा थाटातले पोहे एकदा खाऊ पाहायलाच हवेत.6 / 8गुजरातमध्ये बटाटा पोहे प्रसिद्ध आहेत. तिथे पाेह्यांमध्ये आवर्जून बटाटा टाकला जातो.7 / 8इंदोरी पोहे देखील प्रसिद्ध आहेत. ते लोक पोह्यामध्ये एक खास मसाला टाकतात आणि शेव, कच्चा कांदा टाकून पोहे सर्व्ह करतात. पोहे- जिलेबी हा तिथला एक प्रसिद्ध नाश्ताप्रकार आहे.8 / 8एरवी पोहे करण्यासाठी आपण जसे भिजवतो, तसे भिजवायचे. त्या पोह्यांना तेल, तिखट, मीठ, मेतकूट लावायचे आणि वरतून कडिपत्ता, शेंगदाणे, मिरची टाकून फोडणी घालायची. हा पाेह्यांचा प्रकारही अनेकांच्या आवडीचा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications