World Vegan Day 2021 : What is vegan diet? know origin and benefits of vegan diet
अनुष्का-विराट का झाले वेगन? वेगन नक्की आहे काय? ही लाइफस्टाइल आली कुठून? By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 4:47 PM1 / 11विराट अनुष्का वेगन का झाले, त्यांनी नॉन व्हेज का बंद केलं हे त्यांनी सांगितले. अनेक सेलिब्रिटीही आता वेगन होत आहेत. सध्या ही वेगन आहारपद्धती तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय झालीय. तंत्रज्ञान याला कारणीभूत आहेच त्याखेरीज या वर्गाची जी खरेदी क्षमता आहे (परचेसिंग पॉवर) ती पण कारणीभूत आहे. सेलिब्रिटींमुळे वेगन डाएटचा विषय अनेकदा चर्चेत आला. खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक शुभा प्रभू साटम यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 2 / 11हल्ली तुम्हाला हा वेगन शब्द अनेक ठिकाणी आढळतो. तर ही जी वेगन आहरपद्धत आहे ती शाकाहाराची अधिक कट्टर शाखा मानली जाते,(No Pun Intended) ज्यात मांसाहार तर नसतोच पण प्राणिजन्य असे कुठलेही पदार्थ त्याज्य असतात. म्हणजे शकाहारात गणले जाणारे दूध दही मलई खवा ताक पनिर अगदी मध पण निषिद्ध ठरतो,इतके की रेशमी वस्त्र,चामड्याची उत्पादने सुद्धा!!!!3 / 11आज बहुतांश तरुण हे या वेगन पद्धतीने आहार घेतात. १९४४ मध्ये डोनाल्ड वाटसन यांनी हा शब्द आणि चळवळ आणली जी जगभर प्रसिद्ध पावली आहे. इथं एक लक्षात घ्यायला हवं की आजच्या घडीला तरुण वर्ग हिचा मोठा पुरस्कर्ता आहे. ज्याला मिलेनिअल म्हणतात तो तर अधिक आणि हा वर्ग तंत्रज्ञान कुशल , टेक्नॉ सॅव्ही असतो.इतकी जुनी वेगन चळवळ आता टॉक ऑफ दी टाऊन झालीय याचे हे मुख्य कारण आहे.4 / 11हा वर्ग आपण काय करतो आणि का करतो हे सांगण्यात पुढं असतो. तसंच आपण अस्तित्वात असणाऱ्या नियम/रुढीच्या वेगळे काही करत असू तर ते सर्व या तरुणांकडून सोशल मीडियावर अहमहिकेने प्रसिद्ध केलं जातं. त्यामुळं दहामधील निदान सहा हल्ली वेगन असतात. आता हा जो विचार आहे तो शास्त्रीय दृष्टीने कितपत योग्य , अयोग्य याची कारणमिमांसा करण्याची ही जागा नाही. इथं बघायचंय की तरुणांना या वेगन पद्धतीकडे का जावेसे वाटले?5 / 11पहिलं कारण म्हणजे हल्ली उपलब्ध असणारी माहिती. हा माहिती तंत्रज्ञान यांचा स्फोट झाला नव्हता तेव्हा अनेकदा अज्ञानात सुख असण्याची परिस्थिती असायची.पण आता कोंबड्या कश्या वाढवल्या जातात? आणि गाई,म्हशींना अधिक दूध यावे म्हणून कुठली इंजेक्शने टोचली जातात? हे कळते तेव्हा नकळत एक भीती पैदा होते.6 / 11परत सध्याची जीवनशैली, ताण तणाव, प्रदूषण, असे अन्य घटक आहेतच. या सर्वांना पूर्ण १००%बंद करणे शक्य नसते ,त्यामुळं मग जे शक्य आहे ते पाहिलं जातं,साहजिकच मग सेफ किंवा कोणतेही धोके नसणारा आहार घेणे याकडे लोक आकृष्ट होतात. त्यातून मग अशी वेगन आहार पद्धत लोकप्रिय होते.7 / 11परत त्यात भर घालायला सोशल मीडिया आहेच. आपण किती वर्षे /महिने वेगन आहोत?त्याचे काय काय फायदे झालेत?आपण तसे का झालो ?इत्यादी अनुभव रोज शेकड्यांनी शेअर केले जातात.वाचणाऱ्याच्या मनात कुतूहल जागृत होत आणि आणखीन एक वेगन होतो.8 / 11आधी हे परस्पर संवाद म्हणा किंवा विचार पोहोचवण्यासाठी साधने कमी होती,सध्याच्या युगात ती अडचण नाही.तरुणांना नवे हवेच असते आणि असे काही दिसले की ते आकृष्ट होतात.इथं मी या आहार पध्दतीवर टीका मुळीच करत नाहीये,किंबहुना अन्नावर सरकार/समाजाकडून असणारे, किंवा घातले जाणारे निर्बंध निरोगी लोकशाहीचे द्योतक नाहीत हे माझं मत आहे. सध्या ही वेगन आहारपद्धती तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय झालीय.9 / 11तंत्रज्ञान याला कारणीभूत आहेच त्याखेरीज या वर्गाची जी खरेदी क्षमता आहे ,परचेसिंग पॉवर,ती पण कारणीभूत आहे.कारण वेगन आहार पद्धतीत प्रचलित पदार्थाना जे पर्याय असतात ते बर्यापैकी महाग असतात,उदाहरणार्थ दूध, त्याऐवजी बदाम दूध वापरतात, पनिर ऎवजी टोफू असतो. मधाच्या जागी मेपल सिरप असते,ही काही प्रमुख उदाहरणे आहेत,पर्याय किती महाग असतात ते दर्शवण्यासाठी.10 / 11इथं एक लक्षात घेणे आवश्यक आहे की कोणतीही गोष्ट/घटना जेव्हा घडते तेव्हा तिच्यामागे काही कारण असते. साधारण वीसेक वर्षे आधी बॅड कोलेस्ट्रॉल, ट्रिपल रिफाइण्ड तेल, ऑलिव्ह तेल यांचा प्रचंड बोलबाला होता.लोकांना परवडत नसून ही तेल विकत घेतली जायची. आता आपण परत खोबरेल/तीळ तेल,तूप,यांच्याकडे आलोय.11 / 11लोकांनी काय करावे?काय खावे??कसे खावे?कुठं जावे?काय घालावे?या आणि यासारख्या असंख्य गोष्टीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतले जातात आणि नंतर ते पद्धतशीर रीतीने पसरवले जातात.Everything Boil Down To Money. हे विसरता कामा नये. इतकेच महत्त्वाचे. आणखी वाचा Subscribe to Notifications