शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री लवकर झोप येत नाही? ५ योगासनं करून बघा, शांत झोप लागेल, मनही होईल शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 9:12 AM

1 / 7
१. रात्री अंथरुणावर पडलं की अनेक जणांना स्क्रीन बघण्याची सवय असते. त्यामुळे मग चटकन झोप येत नाही. झोप आलीच तरी शांत झोप लागत नाही. काही जणांना स्क्रीन न बघताही हा त्रास होतो.
2 / 7
२. रात्री शांत झोप झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशी दिवसभर सुस्ती येते, चिडचिड होते, अस्वस्थता, अपचन असाही त्रास जाणवतो. म्हणूनच रात्री लवकर झोप येण्यासाठी आणि मुख्य म्हणजे शांत झोप येण्यासाठी ही काही योगासनं करून बघा. ही योगासनं रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर पडल्या- पडल्या केली तरी चालतात.
3 / 7
३. यातलं सगळ्यात पहिलं आसन म्हणजे भुजंगासन. एखादा मिनिट भुजंगासन केल्याने संपूर्ण शरीराचा ताण हलका होण्यास मदत होते आणि शांत झोप लागण्यास फायदा होतो
4 / 7
४. दुसरे आसन आहे मर्कटासन. यामुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. कधीकधी शरीरावरचा ताण कमी झाला की हळूहळू मनावरचा ताणही कमी होतो आणि शांत झोप लागते.
5 / 7
५. तिसरे आसन आहे बालासन. ते केल्यामुळे मेंदूच्या दिशेने पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो.
6 / 7
६. लेग अप पोझिशन केल्यानेही चांगली झोप येते. यासाठी जमिनीला पाठ टेकवा आणि पाय भिंतीवर सरळ रेषेत लावा. दोन्ही हात दोन्ही दिशेने पसरवून ठेवा. काही सेकंद ही आसन स्थिती टिकवा.
7 / 7
७. पाचवे आसन आहे सेतुबंधासन. यामुळेही पाय, पाठ, रिलॅक्स होऊन त्यांना आराम मिळतो. तसेच मेंदूच्या दिशेने चांगला रक्तपुरवठा होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सYogaयोगासने प्रकार व फायदेMental Health Tipsमानसिक आरोग्य