शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

योग ट्रेनर ते अभिनेत्री, अनुष्का शेट्टीचा सुपरस्टार होण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास, पाहा फोटो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2022 6:20 PM

1 / 10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही आपल्या सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आज तिचा ४१ वा वाढदिवस. अनुष्का शेट्टीचं मूळ नाव स्वीटी शेट्टी आहे. सिनेसृष्टीत आल्यानंतर तिने आपलं नाव अनुष्का ठेवलं.
2 / 10
अनुष्का शेट्टी बंगळुरु येथे लहानाची मोठी झाली. तिचं शालेय शिक्षण बंगळुरू येथील शाळेत पूर्ण झाले. अनुष्काला सुरुवातीपासूनच कॉम्प्युटरची खूप आवड होती. यामुळे तिने कॉम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला.
3 / 10
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्काने उच्च शिक्षणासाठी बंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजची निवड केली. या संस्थेतून तिने कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
4 / 10
अनुष्का शेट्टीने काही काळ लहान मुलांच्या शिकवण्याही घेतल्या.
5 / 10
अनुष्का शेट्टी केवळ शिक्षणच घेत नव्हती. तर शिक्षणासोबत विविध कलांमध्ये पारंगत होती. ती योगामध्ये देखील तज्ज्ञ आहे. अनुष्काने भरत ठाकूर यांच्याकडून योगाचे शिक्षण घेतले. अभिनेत्री होण्यापूर्वी ती योगा इंस्ट्रक्टर होती.
6 / 10
अनुष्का मंगळुरु येथे योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत होती. तिचं सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला सिनेमाची ऑफर दिली. २००५ मध्ये अनुष्काने ‘सुपर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर अनुष्काने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अनुष्काच्या कुटुंबातील कोणीच चित्रपटांमध्ये काम केलं नाही. तिने स्वबळावर सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं.
7 / 10
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघम सिनेमामुळे प्रेक्षक तिचे चाहते झाले. तर २०१३ मधील सिंघम २ मधील अनुष्काच्या अभिनयाचंही अनेकांनी कौतुक केलं. २००९ मध्ये अनुष्काने 'बिल्ला' चित्रपटात प्रभाससोबत काम केलं होतं. या सिनेमातील दोघांच्या केमिस्ट्रीचे लोक दिवाने झाले.
8 / 10
'बाहुबली २' मधली तिने साकारलेली 'देवसेना' ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती. एका रात्रीत अनुष्का ग्लोबल स्टार झाली होती. या दरम्यान प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती. मात्र, स्वतः प्रभासने तो आणि अनुष्का दोघं फक्त चांगले मित्र असल्याचं सांगितलं.
9 / 10
अनुष्का शेट्टीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 'बाहुबली', 'डॉन', 'बिल्ला', 'लिंगा' आणि 'मिर्ची' आणि 'सिंघम' या सिनेमांमधून काम केले आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांतून तिने आपली ताकद दाखवली आहे.
10 / 10
अनुष्का शेट्टीला तिच्या सर्वोत्कृष्ट कामासाठी तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
टॅग्स :Anushka Shettyअनुष्का शेट्टीYogaयोगासने प्रकार व फायदेTollywoodTollywoodbollywoodबॉलिवूड