By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 20:41 IST
1 / 6सांगली : संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली. 2 / 6प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्यांच्या भरतनाट्यम् नृत्याने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. 3 / 6गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी उपस्थिती लावल्याने कृष्णाकाठावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. 4 / 6गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी उपस्थिती लावल्याने कृष्णाकाठावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. 5 / 6श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्याला दि. ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. 6 / 6या पार्श्वभूमीवर सांगली परिसरातील महिला मंडळांनी एकत्र येऊन भगवान बाहुबलींची भक्ती व आराधना करण्यासाठी बुधवारी कृष्णा तिरावर वसंतदादा पाटील स्मारकाशेजारी भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.