1 / 4दर्गा संगीत सभेचा प्रारंभ समीर अभ्यंकर (पुणे) यांच्या गायनाने झाला.2 / 4अभ्यंकर यांनी राग देवगंधार आळविला. विलंबित एकतालात ‘रईन के आगे पिहरवा’ द्रुततालात ‘लाडली बनावत आया’ हा विलंबित ख्याल त्यांनी सादर केला.3 / 4 समीर अभ्यंकर यांना माधव मोडक यांनी तबला साथ, तर अजित पुरोहित यांनी हार्मोनियम साथ केली. 4 / 4संगीत सभेत रईस खान (धारवाड) यांनी राग नटभैरव गायिला. विलंबित एकतालात ‘रसिया मोरा’, द्रुत एकतालात ‘बेग बेग आयो मंदिर’ या चीजा त्यांनी गायिल्या. त्यांना सागर सुतार यांनी तबला साथ, मनोज जोशी यांनी हार्मोनियम साथ व संदीप गुळवणी यांनी तानपुरा साथ केली.