Minister Eknath Shinde's paddy farming, photo goes viral
मंत्री एकनाथ शिंदेंची भातशेती, गावकडचे फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 5:16 PM1 / 10राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांनी मिळवलेल्या पदवीमुळे नुकतेच चर्चेत होते. त्यानंतर, पुन्हा एकनाथ शिंदेचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल झाले होते. 2 / 10मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मुलगा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आपल्या मूळगावी जाऊन शेतात काम करताना पाहायला मिळाले होते. 3 / 10आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे शेतात भाताची लागवड करताना दिसले आहेत. आपल्या मूळगावी जाऊन त्यांनी पुन्हा शेती करण्याचा आनंद घेतला. शिंदे कुटुंबाचं महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे मूळगाव. 4 / 10यापूर्वीही एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावात गेले होते. एक-दोन दिवस गावात घालवल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत बुधवारी थेट शेत गाठलं. 5 / 10त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि चुलत भाऊ महेश शिंदेही होते. शिंदे कुटुंबाने स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन लागवड केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र आज राज्याचे मंत्री आहेत. 6 / 10एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा आपल्या मुळ गावी दरे ता. महाबळेश्वर येथे येऊन आपल्या भात शेतात भात लावणी केली. तसेच बैलांचे औत हाकण्याचा आनंद घेतला. 7 / 10दरे हे बामणोली येथून समोरच शिवसागर जलाशयाच्या पलीकडील काठावर वसलेले एक दुर्गम खेडेगाव आहे. मात्र, आपल्या गावावर प्रत्येकाचं प्रेम असतं, ते प्रेम मंत्री महोदयांनीही व्यक्त केलं. 8 / 10शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण हल्ली गावाकडील लोक शेती व्यवसायाकडे पाठ करुन, नोकरीत जास्त लक्ष देत आहेत. 9 / 10शेती हा एका दाण्याचे शंभर दाणे करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे गावातील तरुण वर्गाला शेती करा असा संदेश एकनाथ शिंदेंनी यापूर्वीही शेतात काम करताना दिला होता.10 / 10एकनाथ शिंदेचे शेती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications