What an idea - Bhade village of satara become maths school, everywhere painting of maths
हे भन्नाटय - 'भिंती झाल्या फळा अन् अख्खं गावच झालं शाळा' By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 2:54 PM1 / 15सातारा तालुक्यातील एक गाव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण, हे अख्ख गावचं गणिताच्या सुत्रांनी भरलेलं आहे. 2 / 15खंडाळा तालुक्यातील भादे या गावातील प्रत्येक घरावर, घराबाहेरील भिंतीवर तुम्हाला गणिताची सुत्रे, पाढे, प्रमेय पाहायला मिळतील. 3 / 15गावातील डिझाईन इंजिनिअर असलेल्या उमेश पवार यांनी मुगुटराव विठोबा पवार यांचे स्मरणार्थ गावातील या भिंती रंगवल्या आहेत. 4 / 15गणिताचे गाव (भादे) एक निस्वार्थ उपक्रम आम्ही राबवत असून लहान मुलांवर गणितीय संस्कार सहज घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे पवार यांनी म्हटलंय. 5 / 15मुलांच्या मनातील गणित विषयाची भीती घालवयाची असेल तर लहानपणीच गणित विषयातील संकल्पना सहजपणे त्याला समजण्यासाठी केवळ वर्ग खोलीतच नव्हे, तर त्याला सहजपणे दिसेल अशा ठिकाणांहून त्याला गणित शिकायला मिळावे, यासाठी लढवलेली ही भन्नाट कल्पना. 6 / 15 गणिताचे मनन, विवेचन व्हावे व गणितातील अधिक म्हणजे आयुष्यात सद्गुणांची बेरीज उणे करणे म्हणजे दुर्गुणांची वजाबाकी गुणाकार करणे म्हणजे सद्गुणांची पट करणे व भागाकार करणे म्हणजे दुर्गुणांचे एवढे छोटे भाग करणे की, शेवटी दुर्गुण नष्ट होत बाकी शुन्य येते.7 / 15गावातील प्रत्येक भिंतीवरुन गणितीय संदेश देण्यात आला आहे, या भींतीवरही दिनदर्शिका दिसून येत आहे.8 / 15गणित सोडवणं हीच मोठी कसोटी असते, तर गणितातील कसोटी शिकणं हे मोठं गणित असतंय9 / 15क्षेत्रफळाची सुत्रे लक्षात ठेवायची म्हणजे लय अवघड रे बाबा, पण या गावात तेही सोप्पय10 / 15संख्यारेषा हा गणितातील भागही तुम्हाल गावातील भींतींवर पाहायला मिळेल. 11 / 15कोण मोजणे, त्रिकोण मोजणे हेही गणितामधील महत्त्वाच गणित आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये हे गणितं आवर्जुन विचारली जातात.12 / 15बऱ्याचजा आपल्या गुंठामंत्री माहिती असतो, पण क्षेत्रफळाबद्दल विचारलं तर आपली टाय टाय फिश होण्याची वेळ येते13 / 15नफा-तोटा, समान गुणोत्तर हे जर गावातच शिकायला मिळालं तर शाळेत गणित कित्ती सोपं जाईल.14 / 15कर्ज आणि व्याज यांच दैनंदिन व्यवहारात आपल्याशी अतुट नातं असतं, पण शाळेपासून आजपर्यंत व्याज अन् चक्रीवाढ व्याजाचं गणित आपल्याला जमलं नाही. 15 / 15उद्याच्या भारताचा एक गणितज्ञ, एक आदर्श नागरिक घडविण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा प्रपंच, असल्याचंही उमेश पवार यांनी म्हटलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications