Erectile dysfunction problem increasing in lockdown due to coronavirus
लॉकडाऊनमध्ये वाढली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या, 'ही' आहेत मुख्य कारणे..... By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:51 PM1 / 11कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या आरोग्यासंबंधी वेगवेगळे समस्या येत आहेत. अनेकांचं वजन वाढलं आहे तर अनेकांना अंगदुखीची समस्या आहे. अशात आणखी एक समस्या समोर आली आहे. ती म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शन(ताठरता नसणे). 2 / 11लॉकडाऊन दरम्यान इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या अधिक वाढल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. एक्सपर्ट्सनुसार, लॉकडाऊन दरम्यान फार जास्त स्ट्रेस आणि अल्कोहोलमुळे ही समस्या वाढली आहे.3 / 11'सुपर ड्रग ऑनलाइन डॉक्टर' यांच्यानुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत इरेक्टाइल डिस्फंक्शन सर्व्हिसच्या मागणीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यात अजिबात दुमत नाही की, लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या लोकांसाठी ही एक मोठी समस्या बनली आहे. 4 / 11इतकेच नाही तर गुगल ट्रेन्डचा डेटाही याकडे इशारा करतो की, ऑनलाइन सर्चमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनबाबत सतत माहिती शोधली जात आहे. गेल्या 12 महिन्यांच्या तुलनेत ही समस्या आता खूप वाढलेली असू शकते. सुपर ड्रगचे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर जो. विलियम यांनी सांगितले की, तणाव, थकाव, अस्वस्थता, धुम्रपान आणि जास्त अल्कोहोलमुळे ही समस्या वाढत आहे.5 / 11तशी तर इरेक्टाइल डिस्फंक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक औषधे आहेत. पण त्याआधी याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. ही कारणे तुम्हाला समजली तर लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता.6 / 11काय आहे ही समस्या? - सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, 'इरेक्टाइल डिस्फंक्शन हा काही आजार नाहीये. हे केवळ एक लक्षण आहे. त्यामुळे याकडे आजाराच्या दृष्टीने बघू नये. म्हणजे याला शारीरिक संबंधावेळी पुरूषाच्या गुप्तांगामध्ये ताठरेची कमतरता असं म्हणता येईल. शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होऊनही पेनिसट्रेशनसाठी इरेक्शन न होणे आणि दोन्ही पार्टनर असंतुष्ट राहणे यालाही इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हटलं जातं. 7 / 111) लठ्ठपणा - हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, जास्त वजनामुळे हृदयरोग, डायबिटीज आणि हाय कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. या कारणांनी सुद्धा इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते. एका रिपोर्टनुसार, 42 इंचापेक्षा अधिक कंबर असलेल्या 50 टक्के लोकांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या असण्याची दाट शक्यता असते.8 / 112) धुम्रपान - सिगारेटमुळे तुमची फुप्फुसं खराब होण्यासोबतच तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शनच समस्याही होते. रेस्पिरेटरी सिस्टीमला कमजोर करणाऱ्या या सिगारेटच्या धुराचं केमिकल शरीरातील नॅच्युरल स्टिम्यूलेशन प्रोसेसला बाधित करतो.9 / 113) डाएट - एनएचएसच्या एका रिपोर्टनुसार, व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते. त्यामुळे डाएटमध्ये पोषक तत्व असलेली फळं, भाज्या, कडधान्यांचा समावेश करावा.10 / 114) वॉक - हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रोज 20 मिनिटे पायी चालल्याने इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका 41 टक्के कमी होऊ शकतो. एक्सरसाइजच्या माध्यमातून लैंगिक जीवनातील परफॉर्मन्स सुधारला जाऊ शकतो.11 / 115) स्ट्रेस - जास्त स्ट्रेस किंवा सतत अस्वस्थ वाटत असेल तर त्यांना सुद्धा ही समस्या होऊ शकते. यावर तुम्ही काउन्सेलिंग द्वारेही उपचार घेऊ शकता. तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही इतरही काही अॅक्टिव्हिटीजचा आधार घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications