शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लैंगिक जीवन : पुन्हा पु्न्हा 'या' चुका कराल प्रत्येकवेळी निराशाच येईल हाती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 4:00 PM

1 / 13
जर तुम्हाला वाटत असेल की, शारीरिक संबंध केवळ एक दहा-पंधरा मिनिटांची अ‍ॅक्टिविटी आहे आणि यासाठी केवळ इंटरकोर्सच पुरेसा आहे तर तुम्ही चुकताय.
2 / 13
मुळात शारीरिक संबंध एकप्रकारची थेरपी आहे. यात मन आणि शरीराला रिफ्रेश वाटतं. पण अनेकजण याकडे गंभीरतेने बघतच नाहीत आणि सतत चुका करत राहतात. याने तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं लैंगिक जीवन उद्धस्त होतं.
3 / 13
समजून घ्या गरज - लैंगिक जीवन आनंदी असेल तर तुम्ही आतून खूश राहता आणि अशात तुमची सगळी काम योग्यप्रकारे होतात. पण काही छोट्या छोट्या चुकांमुळे लैंगिक जीवन ओझं वाटू लागतं.
4 / 13
जर तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात नवा उत्साह भरायचा असेल तर याचं महत्त्व आणि गरज समजून घ्या. तुम्ही त्या चुका करणं टाळा ज्यामुळे तुमचं लैंगिक जीवन खराब होत आहे.
5 / 13
काही क्षणात ऑन-ऑफ - जास्तीत जास्त पुरुषांसाठी शारीरिक संबंध हे थेट बेडरुममध्ये सुरु होतात. पण महिला विजेच्या बल्बप्रमाणे यासाठी रेडी होऊ शकत नाहीत. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागते. सुरुवात लाडीगोडीने, रोमान्सने आणि मिठी मारुन करावी लागते.
6 / 13
याने तुमच्याप्रति आकर्षण वाढेल. एक्सपर्ट सांगतात की, ३० सेकंद मीठी मारल्याने महिलांमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतात. याने तुमच्यावरील त्यांचा विश्वास वाढतो आणि याने जवळिकताही वाढते.
7 / 13
अंदाज लावणे - तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून काय हवंय याचा केवळ अंदाज बांधत बसण्यापेक्षा थेट प्रश्न विचारा. महिलांना orgasm चा अनुभव फार उशीरा मिळतो. त्यांना विचारा की त्यांना कसं वाटतंय, त्यांना वेगळं काही हवंय का? काय हवंय?
8 / 13
लाडात करा प्लॅनिंग - जर तुमचा एखादा प्लॅन योग्यप्रकारे काम करुन गेला असेल तर नेहमीच तसं होईल असं अजिबातच नाही. कोणती गोष्ट तुमच्या पार्टनरचा मूड बनवू शकते, हे त्यांच्या मूडवर किंवा त्यांच्या मासिक पाळीवर अवलंबून आहे.
9 / 13
त्यामुळे पार्टनरकडे लक्ष द्या आणि हे जाणूण घेण्याचा प्रयत्न करा की, तुमच्या कोणत्या प्रक्रियेला त्यांचं शरीर अधिक प्रतिक्रिया देत आहे. जी अॅक्टिविटी त्यांना अधिक आनंद देते ती तुम्ही फॉलो करु शकता. पण एक्सपर्टनुसार महिला नेहमी ही तक्रार करतात की, त्यांचे पार्टनर घाईने स्टेप बदलतात.
10 / 13
फक्त शारीरिक खेळ समजू नका - फोरप्लेला अधिक वेळ द्या. काही पुरुष केवळ फिजिकल स्टिमुलेशनवर लक्ष केंद्रीत करा. ते मेंटर स्टिम्युलेशनकडे दुर्लक्ष करतात
11 / 13
पण सत्य हेच आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरकडे प्रेमाने बघता, त्यांना कुरवाळता किंवा एखाद्या रोमॅंटिक क्षणाची आठवण करुन देता तेव्हा त्या मानसिक रुपाने तयार झालेल्या असतात.
12 / 13
केवळ इंटरकोर्सने ऑर्गॅज्मची अपेक्षा - ८० टक्के महिलांना केवळ इंटरकोर्सने ऑर्गॅज्म होत नाही. असं होण्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त पोजिशन्स क्लिटरसला थेट स्टीम्युलेट करत नाहीत.
13 / 13
त्यांना आनंद देण्याचे आणखीही काही प्रकार असतात. एक्सपर्ट सांगतात की, महिला पार्टनरसोबत वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा. काही महिलांना सिड्यूस होणं आवडतं. तर काही महिलांना फ्लर्ट करणं आवडतं.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप