Sex life : Why do women have sex their eyes closed api
लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद का होतात? By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 4:52 PM1 / 11शारीरिक संबंधात केवळ दोन शरीर जवळ येतात असं नाही तर यात भावनाही दडलेल्या असतात. जेव्हा दोन लोक एकमेकांसोबत इंटीमेट होतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेकप्रकारचे प्रश्न तयार होतात.2 / 11लैंगिक जीवनाबाबत तर तसे अनेकांच्या मनात खूपसारे प्रश्न असतात. पण मोकळेपणाने यावर कुणीही बोलत नाहीत. अनेकदा पुरूषांच्या मनात येणारा एक प्रश्न आहे. ज्याबाबत ते कधीही पार्टनरसोबत बोलत नाहीत. 3 / 11त्यांना प्रश्न पडतो की, शारीरिक संबंधावेळी महिला डोळे बंद का होतात? काही महिलांचे डोळे बंद होत नाही. चला जाणून घेऊन शारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद होण्याचं गुपित आणि याचे फायदे...4 / 11रिसर्च काय सांगतो? - एका रिसर्चनुसार, जसं शिंकण्यावर आपलं नियंत्रण नसतं. शिंकताना ज्याप्रमाणे डोळे बंद होतात, तशाच महिला परमोच्च आनंद मिळवत असताना काहीही करून डोळे उघडू शकत नाहीत.5 / 11तसेच यावेळी ग्लॅंडमध्ये तरल पदार्थाचा स्त्राव होतो, ज्याने मेंदूला डोळे बंद करण्याचा संदेश पाठवला जातो6 / 11क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास अडचण - एका सर्व्हेनुसार, जर एखादी महिला शारीरिक संबंधादरम्यान तिचे डोळे बंद करते तेव्हा याचा अर्थ हा होतो की, ती यावेळी शारीरिक संबंधाचा पूर्ण आनंद घेत आहे7 / 11तसेच रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, डोळे बंद होण्याचा संबंध थेट मेंदूशीही आहे. असे मानले जाते की, डोळे जर उघडे राहिले तर महिलांचं पार्टनरवरील लक्ष हटतं. ज्यामुळे क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.8 / 11भावनात्मक कारण - शारीरिक संबंधावेळी कपल्स एकमेकांच्या फार जवळ आलेले असतात आणि ते त्यांच्यातील इंटीमसी व केमिस्ट्रीला एन्जॉय करतात. शारीरिक संबंधावेळी पार्टनरचा प्रतिसाद आणि सुरक्षेची जाणीव होत असते. 9 / 11यावेळी एकाग्रता फार महत्त्वाची असते. डोळे उघडे ठेवल्याने बाहेरील गोष्टी आणि आवाजांमुळे शारीरिक संबंधावरून लक्ष भरकटू शकतं. त्यामुळे महिला डोळे बंद करतात.10 / 11लाज आणि असहजता हेही कारण - ज्या महिला पहिल्यांदा आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवतात, त्यावेळी त्यांच्या थोडी असहजता आणि लाजही असते. 11 / 11ज्यामुळे त्या पहिल्यांदा असहजता दूर करण्यासाठी आपले डोळे बंद करून स्वत:ला सहज असल्याची जाणीव करून देतात. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी डोळे बंद होणे किंवा करणे ही एक सामान्य बाब आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications