लैंगिक जीवन : बाळाच्या जन्मानंतर दोघांचाही इंटरेस्ट कमी होतो का का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 17:19 IST
1 / 11लैंगिक जीवनाबाबत वेगवेगळे गैरसमज लग्न होण्याआधीपासून पसरलेले असतात. त्यातील एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे मुल झाल्यानंतर लैंगिक जीवन संपतं. भलेही मुल झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांशी तुमचा सामना होत असेल. 2 / 11पण हे नक्की की बाळ झाल्यावर लैंगिक जीवन थांबत नसतं. जगभरात होत असलेल्या अभ्यासानुसार, बाळाला जन्म दिल्यावर काही दिवसांनी किंवा महिलांमध्ये कामेच्छा स्वाभाविकपणे परत येते.3 / 11सामान्यपणे बाळाच्या जन्माच्या सहा आठवड्यानंतर डॉक्टर महिलांना शारीरिक संबंध कायम करण्याचा सल्ला देतात. पण काही महिलांना इतक्या कमी वेळेतही सहजता येत नाही. 4 / 11तज्ज्ञ सांगतात की, बाळाच्या जन्मानंतर काही महिलांमध्ये कामेच्छा परत येण्याला वर्षही लागू शकतं. 5 / 11तज्ज्ञांनुसार, सुरुवातीला शारीरिक संबंधासाठी वेळ काढणं थोडं कठीण असतं. त्यामुळे सुरुवातीला केवळ एकमेकांना जवळ घेणे, किस करणं किंवा फोरप्ले पुरेसा ठरतो. याने कामेच्छा जागृत होण्यास मदत होते. 6 / 11बाळ झाल्यानंतर वजन वाढल्याने ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत आली होती. पण ऐश्वर्याने आपलं शरीर नैसर्गिकरित्या शेपमध्ये येऊ दिलं. 7 / 11त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की, हे मान्य करा की, तुमचं शरीर बदललं आहे. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. याउलट शरीर फिट नसण्याची चिंता लैंगिक इच्छा कमी करते. 8 / 11जर तुमची प्रसुती नॉर्मल झाली असेल आणि तुम्हाला फार जास्त त्रास झाला नसेल तरीही पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणं स्वाभाविक आहे. कारण महिलांचं गुप्तांग फार नाजूक असतं आणि यात नैसर्गिक कोरडेपणामुळे समस्या होऊ शकते.9 / 11अशावेळी तज्ज्ञ सांगतात की, घर्षण होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकंटचा वापर करावा. पण जर वेदना असह्य होत असेल तर शरीर सामान्य होण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. 10 / 11तज्ज्ञांनी सांगितले की, काही पुरुषांसाठी हे आणखी कठीण होतं, जेव्हा ते डिलेवरी होताना तिथे उपस्थित असतात. पत्नी आता एका बाळाची आई झाली आहे हे काही पुरुषांना उत्साहित करतं तर काहींना नाही. 11 / 11यामुळेही पती शारीरिक संबंधापासून दूर पळत असल्याची तुम्हाला भीती असेल तर त्यांना विश्वास द्या की, तुम्ही अजूनही आधीसारख्या एनर्जेटिक आहात. याने त्यांच्यातील कामेच्छा कायम राहिल.