शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लैंगिक जीवन : संबंधासाठी सकाळची वेळ बेस्ट असल्याचं वैज्ञानिक कारण माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 4:02 PM

1 / 11
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाइलममध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जास्तीत जास्त लोक हे वेगवेगळ्या कारणांनी तणावात राहत असल्याने त्यांचं लैंगिक जीवन प्रभावित होत आहे. (Image Credit : glamour.com)
2 / 11
त्यासोबतच काही लोकांच्या शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने त्यांचा शारीरिक संबंधातील रस कमी होताना दिसतो आहे.
3 / 11
तुम्ही जर तुमच्यानुसार, शारीरिक संबंधासाठी योग्य वेळ जाणून घ्याल तर तुमचंही लैंगिक जीवन हेल्दी होऊ शकतं.
4 / 11
तज्ज्ञांनुसार, लैंगिक जीवन चांगलं ठेवण्यासाठी सकाळच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणे अधिक फायदेशीर ठरतं असं अनेक शोधातून समोर आलं आहे.
5 / 11
याला शारीरिक आणि मानसिक कारण आहे. विज्ञानाचं असं म्हणणं आहे की, आपल्या शरीरात कार्टिसोलचा स्तर सकाळी वाढणे सुरु होतो आणि दिवसाच्या दरम्यान हळूहळू एड्रिनल ग्रंथीमध्ये तणाव निर्माण करतं.
6 / 11
सकाळी उठल्यानंतर व्यक्ती आपल्या नियमीत कामांना म्हणजे नाश्ता तयार करणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे, त्यांना शाळेत सोडणे आणि आपली तयारी करणे यात व्यस्त होतात. या सर्व कामांमुळे तणावा वाढतो.
7 / 11
त्यामुळे वेगवेगळ्या रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पहाटे चार ते सहा ही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सर्वात उत्तम वेळ आहे.
8 / 11
इतर वेळेपेक्षा यावेळी कपल्स अधिक आनंद मिळवू शकतात. या वेळेत चांगले शारीरिक संबंध होणे याचं एक कारण म्हणजे रात्री चांगली झोप होऊन व्यक्तीचा संपूर्ण तणाव दूर होतो.
9 / 11
आणि सकाळी शारीरिक संबंध ठेवल्यावर अधिक सूख मिळतं. अनेकजण सकाळी शारीरिक संबंध ठेवताना ऑर्गॅज्मचाही आनंद घेऊ शकतात.
10 / 11
ज्याप्रकारे दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी एका हेल्दी ब्रेकफास्टची गरज असते, त्याचप्रमाणे सकाळी शारीरिक संबंध ठेवल्यावर व्यक्ती संपूर्ण दिवस अधिक सक्रिय, अधिक एकाग्र आणि तणावमुक्त राहतो.
11 / 11
पण त्यासोबतच आणखीही काही अशी कारणे आहेत ज्यामुळे पहाटे पहाटे शारीरिक संबंध ठेवणे चांगलं मानलं जातं.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप