नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
या लोकांची सेक्स लाइफ असते अधिक चांगली, नव्या अभ्यासातून समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:12 IST
1 / 9सेक्स ह्या विषयावर फारसं उघडपणे बोललं जात नाही. मात्र आपली सेक्शुअल लाइफ चांगली करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. अनेक जण सेक्स लाइफ चांगली करण्यासाठी आपल्या आहारातही बदल करतात. तर काही जण डॉक्टरांचे सल्ले घेतात. 2 / 9मात्र एका नव्या सर्व्हेमधून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी लोकांची सेक्स लाइफ खूप चांगली असते. हा सर्व्हे यूकेमधील एका एक्स्ट्रामॅरिटल वेबसाइटने केला आहे. 3 / 9हा खास सर्व्हे ५०० शाकाहारी आणि ५०० मांसाहारी व्यक्तींवर करण्यात आला. या सर्वेमधून ५७ टक्के शाकाहारी लोक आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा सेक्स करत असल्याचे समोर आले. तर ४९ टक्के मांसाहारी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सेक्स करत असल्याचे समोर आले. दरम्यान, मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोक अधिक डर्टी टॉकचा आनंद घेत असल्याचेही दिसून आले. 4 / 9 या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ८४ टक्के शाकाहारी लोक आपल्या सेक्स लाइफबाबत समाधानी दिसून आले. तर केवळ ५९ टक्के मांसाहारी लोक आपल्या पार्टनरबाबत समाधानी दिसून आले. शाकाहारी लोक मेथीची पाने, बडिशेप आणि जिनसेंग या कामेच्छा वाढवणाऱ्या पदार्थांचा अधिक सेवन करत असल्याचे सर्व्हेमधून दिसून आले. 5 / 9याशिवाय विविध भाज्या नैसर्गिकरीत्या कामोत्तेजक म्हणून काम करतात. हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पॉलीफेनोल आणि बीटा कॅरोटीन सापडते. हे सर्व पदार्थ सेक्स ड्राइव्ह वाढवतात. 6 / 9 हिरव्या भाज्यांशिवाय मुळे असलेल्या गाजरासारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोन वाढण्यासह सेक्स ड्राइव्हसुद्धा उत्तम बनवते. 7 / 9 मात्र यापूर्वी झालेल्या काही संशोधनानुसार शाकाहारी लोकांना सेक्स लाइफमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागतो. शाकाहारी महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो. त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन कमी असतो. त्यामुले त्यांच्यामधील लैंगिक इच्चा कमी होते. शाकाहारी भोजनामध्ये झिंक नसते. त्यामुळे सेक्स ड्राइव्ह कमी होते. 8 / 9 तर संकेतस्थळाच्या सर्व्हेमधून एक बाब समोर आली आहे ती म्हणजे जर तुम्ही मांसाहारी असलात तर तुम्हाला तुमची सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएट किंवा जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्लाँट बेस्ड फूडचा समावेश करावा लागेल. 9 / 9याशिवाय तुम्ही आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज खाऊ नका. त्यामुळे तुमचे आरोग्य संतुलित राहील. तसेच हळूहळू तुमचे सेक्स ड्राइव्हसुद्धा चांगले होईल.