शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pandharpur: पाहावा विठ्ठल... कार्तिकीच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी उभा पांडुरंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 4:17 PM

1 / 10
आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीत एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो. देशभरातून लाखो भाविक वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मैल न मैल प्रवास करुन येत असतात.
2 / 10
पांडुरंगाचे जगभरात भाविक भक्त असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा विठु-माऊली आहे. त्यामुळे, गोवागोवी एकादशी साजरी केली जाते. पांडुरंगाचे स्मरण करुन पूजाही केली जाते. अनेकजण आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठलाचे स्मरण करतात.
3 / 10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी एकादशीच्या पूर्वसंध्येला सागर तिर्थ समुद्रकिनारी सुंदर शिल्प रेखाटल्याचे पाहायला मिळालं.
4 / 10
राम कृष्ण हरी असा जयघोष करत विराज चिपकरांनी आपली कला विठ्ठल चरणी अर्पण केली. किनाऱ्यावरील हे वाळूशिल्प पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. या शिल्पाचे फोटो आणि सेल्फी काढण्यासाठीही उत्साह दिसून येत होता.
5 / 10
यापूर्वीही अनेकदा वाळू शिल्पकारांनी मोठमोठ्या घटनांचे, दिग्गज व्यक्तींच्या जंयती, पुण्यतिथीचे स्मरण करुन वाळू शिल्प साकारले होते. मात्र, सोनसुरे येथील रविराज चिपकर यांनी कार्तिकीच्या निमित्ताने हे शिल्प साकारले आहे.
6 / 10
कार्तिकी एकादशीनिमित्ता आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा झाली. सकाळपासून सोशल मीडियावरही पंढरपूरच्या पांडुरंगाचे फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले.
7 / 10
गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
8 / 10
विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी अन् कार्तिकी एकादशीची पूजा करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मानही मिळाला आहे.
9 / 10
देवेंद्र फडणवीस यांना प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. राज्यात ४ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले अन् विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे अनपेक्षितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले.
10 / 10
यापूर्वी, २०१४ ते १९ या काळात त्यांनी ५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री बनून काम पाहिले. त्यामुळे, साहजिक मुख्यमंत्री असल्याने आषाढी एकादशीचा बहुमान त्यांना मिळत असे. तर, कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते होते. त्यामुळे, यंदा उपमुख्यमंत्री असल्याने हाही मान त्यांना मिळाला.
टॅग्स :Pandharpurपंढरपूरsindhudurgसिंधुदुर्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस