Nilesh Rane: 'We didn't listen to Thackeray, but you..; Rane was again angry with Kesarkar
Nilesh Rane: 'आम्ही ठाकरेचं ऐकलं नाही, तुमचं तर..; केसरकरांवर पुन्हा संतापले राणे By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 12:06 PM1 / 10बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उल्लेख करत पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असे केसरकर यांनी सांगितले. 2 / 10त्यावेळी, आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत राणे कुटुंबांवर प्रहार केला होता. त्यानंतर, नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकरांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे, राणे-केसरकर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. 3 / 10सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर राणेपुत्र दिपक केसरकरांवर चांगलेच भडकले आहेत. नितेश राणेंनी यासंदर्भात बोलणे टाळले, पण निलेश राणे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 4 / 10दिपक केसरकर कधी येणार आणि आम्ही काम करणार, यासाठी थांबलो होतो का आ्ही?. दीपक केसरकर स्वत:ला खूप महत्त्व दयायला लागले आहेत. केसरकरांचं एवढं महत्त्व केव्हाच नव्हतं आणि आता ते शिल्लक पण राहिलं नाही. दिपक केसरकर यांनी स्वतःची लायकी आधी ओळखावी. ते कदाचित विसरले असतील, अशा शब्दात निलेश राणेंनी दिपक केसरकर यांच्यावर प्रहार केला आहे. 5 / 10मला तर वाटतं त्यांना कसला तरी मानसिक रोग झाला आहे. एक दिवस ठाकरे कुटुंबाबद्दल चांगले बोलतात, दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरोधात बोलतात. केसरकरांचा वरचा माळा रिकामा झाला किंवा काहीतरी गडबड झाली, अशी खोचक प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली. 6 / 10आदित्य ठाकरेंच्या बदनामीसंदर्भात बोलताना, डॉ. शुभ्रमन्यम स्वामी, अर्णव गोस्वामी आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तेव्हा बोलले. तेव्हा दिपक केसरकर गोव्यामध्ये होते. दीपक केसरकर यांनी लायकीत राहायला शिकावं, असा सल्लाही राणेंनी दिला. 7 / 10राणेंना नख लावाल तर तुम्हाला फाडून टाकणार एवढं लक्षात ठेवा. आमच्या भानगडीत पडू नका. तुमची मतदारसंघात काय लायकी आहे, ते आम्हाला माहिती आहे, कदाचित ती मुंबईत माहिती नसेल. 8 / 10आम्ही केव्हा ठाकरेंचं ऐकल नाही तर तुमचं ऐकणं सोडूनच द्या. तुम्हाला एवढीच राणेंसोबत काम करायची हौस असेल तर १ तारीखपासून ड्रायव्हर ची नोकरी रिकामी होतेय, तुम्ही जॉईंट व्हा. असा निलेश राणेंनी केसरकरांवर प्रहार केला.9 / 10दरम्यान, दिपक केसरकर यांनी यापुढे आपण राणे कुटुंबीयावर बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. तर, शिंदेगटाच्या प्रवक्तेपदी दिपक केसरकर राहतील का, यासंदर्भात बोलताना शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.10 / 10दरम्यान, दिपक केसरकर यांनी यापुढे आपण राणे कुटुंबीयावर बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. तर, शिंदेगटाच्या प्रवक्तेपदी दिपक केसरकर राहतील का, यासंदर्भात बोलताना शिंदेंनी स्पष्टच सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications