शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानातील अशी ६ हिंदू मंदिरं जिथं दर्शनासाठी जगभरातून येतात भाविक, एकदा पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 6:47 PM

1 / 7
एकेकाळी भारताचाच हिस्सा राहिलेल्या पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजाची चांगली लोकसंख्या होती. पण सध्या पाकिस्तानातील हिंदूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. १९४७ साली फाळणीच्या दरम्यान पाकिस्तानात तब्बल ३०० हिंदू मंदिरं होती. पण यातील अनेक मंदिरं कट्टरपंथीयांनी उद्ध्वस्त केली. दरम्यान, आजही काही निवडक हिंदू मंदिरं पाकिस्तानात आहेत. या मंदिरांबद्दल जाणून घेऊयात...
2 / 7
पाकिस्तानच्या बलुचिस्तानात हिंगलाज मातेचं मंदिर आहे. देवी सतीचं शक्तीपीठ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुहेत वसलेलं हे मंदिर हिंगलाज येथे हिंगोल नदीच्या किनाऱ्यावर आहे. या मंदिराला हिंगलाज देवी, हिंगुला देवी आणि नानी मंदिर नावानं ओळखलं जातं.
3 / 7
कराचीमध्ये असलेलं १५०० वर्ष जुनं श्री पंचमुखी हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराचे हिंदू धर्मियांसाठी खास महत्व आहे. कारण हे जगातील हे एकमेव असं मंदिर आहे ज्यात हनुमानाची मूर्ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. या मंदिरातील मूर्ती मानवनिर्मित नाही.
4 / 7
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील कटास स्थित कटारराज मंदिर किला कटास म्हणूनही ओळखले जाते. हे एक हिंदू तिर्थक्षेत्र आहे. यात अनेक मंदिरं एकमेकांशी जोडली गेली आहेत. कटासमध्ये असलेल्या या धार्मिक स्थळावर एकूण सात प्राचीन मंदिरं आहेत.
5 / 7
मुलतान येथील सूर्य मंदिराला आदित्य सूर्य मंदिर नावानं ओळखलं जातं. हे प्राचीन मंदिर भगवान सूर्यसाठी तयार केलं गेलं होतं. भगवान श्री कृष्णचे पुत्र सांबा यांनी या सूर्य मंदिराची निर्मिती केली होती अशी आख्यायिका आहे.
6 / 7
कराचीतील मनोरा द्वीप येथील वरुण देवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या मंदिराची निर्मिती समुद्रात होणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे चौथ्या ते दहाव्या शतकात झाली होती.
7 / 7
जगन्नाथ मंदिर पंजाब प्रांतातील सियालकोट येथे आहे. पाकिस्तानातील प्राचीन मंदिर म्हणून याची ख्याती आहे. या मंदिरात दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात.
टॅग्स :TempleमंदिरHinduहिंदूPakistanपाकिस्तान