"त्याने स्पर्धकाला मिठी मारुन ३-४ वेळा..."; अश्लिल प्रश्न विचारल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने केलं हे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:47 IST
1 / 7समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट हा शो वादात सापडला होता. या शोच्या एका एपिसोडमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला त्याच्या आई वडीलांबद्दल अश्लील प्रश्न विचारला होता. यानंतर वाद अधिकच वाढला.2 / 7रणवीरला त्याच्या चुकीबद्दल माफी मागावी लागली. त्याचवेळी रैनाने इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड डिलीट केले. आता त्या शोमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्या दिवशी रणवीरने हा प्रश्न विचारल्यानंतर काय झाले ते सांगितले आहे.3 / 7मोहित खुबानी नावाच्या कंटेंट क्रिएटरने दावा केला की वादग्रस्त एपिसोडमध्ये परीक्षकांपैकी एक असलेल्या रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वाईट वक्तव्यानंतर लगेचच माफी मागितली होती.4 / 7जेव्हा तो एपिसोड प्रसारित झाला, त्याच्या आधी तिथे काय घडलं ते मी सांगतो. त्या दिवशी मी हॉलमध्ये होतो. मी ऑडिअंसमध्ये होतो. काय झाले ते मला माहीत आहे. रणवीरने तो विनोद केला होता. तो विनोद केल्यावर तो ३-४ वेळा म्हणाला की मला माफ करा, तुम्हाला वाईट वाटलं का?5 / 7त्याने स्पर्धकालाही विचारले की त्याला हे सोयीचे आहे का. त्यावेळी स्पर्धकाने सांगितले की ठीक आहे. मला माहित आहे की मी सर्व काही ठीक करू शकत नाही. पण तरीही रणवीरने स्पर्धकाला अस्वस्थ वाटणार नाही याची खात्री केली. रणवीर त्याच्याशी बोलला. तो बरा आहे का, असेही काही वेळेने विचारले.6 / 7त्यानंतर स्पर्धकाने तो शोही जिंकला होता. सर्वांनी आनंदही साजरा केला. रणवीरने त्याला मिठी मार. रणवीर त्याला अनेक वेळा सॉरी म्हणाला. म्हणून मी सांगतोय की विनाकारण द्वेष पसरवू नका, असंही मोहित खुबानीने म्हटलं.7 / 7रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला 'तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना दररोज जवळीक साधताना बघायला आवडेल की एकदा त्यांच्यासोबत सामील व्हायला आवडेल?' असा धक्कादायक प्रश्न विचारला. हे ऐकल्यानंतर समय रैनाने हे सर्व पॉडकास्टचे नाकारलेले प्रश्न आहेत. हा कसला प्रश्न आहे? असं म्हटलं होतं.