शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon employees pee in bottles : १० तासांच्या शिफ्टमध्ये बाटलीच करावी लागते लघवी; Amazon डिलिव्हरी बॉईजचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 1:11 PM

1 / 8
जगभरात अॅमेझॉन ही सगळ्याच मोठी आणि विश्वासार्ह कंपनी मानली जाते. या कंपनीत काम करणं लोकांसाठी स्वप्न पाहण्याहॉप्रमाणे असतं. सध्या सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉई एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोतून दिसून येतं की, या कर्मचाऱ्यांना प्रचंड ताणाखाली काम करावं लागत आहे.
2 / 8
सध्या अॅमेझॉन कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे आता शौचास जाण्यासाठीसुद्धा वेळ नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, अमॅझॉनच्या कर्मचाऱ्यांना शौचालयात जाण्यासाठीसुद्धा वेळ नाही. त्यामुळे मुत्र विसर्जन करण्यासाठी ते लोक बॉटलचा वापर करत आहेत.
3 / 8
अमेरिकेतील एका नेत्यानं याबाबत ट्विट केल्यानं जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली अॅमेझॉन कंपनी वादाच्या कचाट्यात सापडली आहे. सोशल मीडियावर या कंपनीवर प्रश्न उपस्थित केले जात असून आपल्या कर्मचाऱ्यांचे शोषण करत असल्याचे आरोपही लावले जात आहेत.
4 / 8
मार्क पोकन नावाच्या एका व्यक्तीनं ट्विट करून लिहिले की, आपल्या कर्मचाऱ्यांना १५ डॉलर प्रति तास दिल्यानं प्रोग्रेसिव्ह वर्कप्लेस होत नाही. खास करून जेव्हा तुमचे कर्मचारी कामाच्या ताणाखाली येऊन बाटलीत मुत्र विसर्जन करतात.
5 / 8
हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या कंपनीला खूप ट्रोल केलं जात आहे. एका वापरकर्त्यानं म्हटलं की, कामगार वार्ताहराच्या नियमांनुसार मी अॅमेझॉनबाबत अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. अॅमेझॉनचा कामाचा ताण जास्त असल्यामुळे वाहन चालकांना मुत्रविसर्जन करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.
6 / 8
जेम्स बल्डवर्थ नावाच्या माणसानं लिहिलं की, ' मी तोच व्यक्ती आहे. ज्यानं बाटलीत लघवी केली होती. माझ्यावर विश्वास ठेवा हे असंच होतं.
7 / 8
दरम्यान अॅमेझॉननं या सगळ्या आरोपांना चुकीचं ठरवत ट्विट केलं आहे की, 'तुम्ही बाटलीत लघवी केल्याच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत आहात ना? जर असं असतं तर कोणीही आमच्यासह काम केलं नसतं. खरं पाहता लाखो कर्मचारी अॅमेझॉनमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगतात. कंपनीत लोकांना फक्त चांगला पगारच नाही तर चांगली वागणूकही मिळते. '
8 / 8
रिपोर्टनुसार अमॅझॉन कंपनीत डिलिव्हरीदरम्यान १० तासात ३०० पाकिटांची डिलिव्हरी करावी लागते. जास्तवेळ लागल्यास नोकरी जाण्याचा धोका असतो. अॅमेझॉनमधील चालकांच्या म्हण्यानुसार डिलिव्हरी करताना शौचालय शोधत बसलो तर १० ते २० मिनिटांचा वेळ जातो. म्हणून आम्ही आमच्या सोईसाठी बॉटलचा वापर करतो. अॅमेझॉनचे अनेक वाहनचालक बाटलीतच लघवी करतात आणि त्यानंतर सॅनिटायजरने आपले हात साफ करतात.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयonlineऑनलाइन