शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील खास मार्केट, तब्बल ४ हजार दुकानं; पण पुरुषांना व्यवसायाची परवानगी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 5:10 PM

1 / 9
भारतात एक असं मार्केट आहे जिथं तुम्हाला सर्व खरेदी करता येईल. पण या मार्केटमध्ये पुरुषांना व्यवसाय करण्याची परवानगी नाही. या मार्केटमध्ये फक्त महिलाच व्यवसाय करतात.
2 / 9
मणिपूरच्या इन्फाळ येथे 'मदर्स मार्केट' नावानं एक भव्य मार्केट लोकप्रिय आहे. मणिपूरी भाषेत या मार्केटला इमाकैथिल मार्केट म्हटलं जातं. आशियातील हे सर्वात मोठं 'वुमन मार्केट' आहे.
3 / 9
मणिपूरच्या मदर्स मार्केटमध्ये तब्बल ४ हजार दुकानं आहेत. विशेष म्हणजे ही सर्व दुकानं महिलांकडूनच चालवली जातात.
4 / 9
मणिपूरच्या या सुप्रसिद्ध मार्केटमध्ये पुरुष व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी नाही.
5 / 9
तब्बल ५०० वर्षांपूर्वी या मार्केटची सुरुवात झाली होती असं सांगण्यात येतं. मैती समाजातील पुरुष मंडळी जेव्हा अनेक महिने युद्धासाठी सीमेवर तैनात असत अशावेळी महिला सारंकाही सांभाळत असत. त्यामुळे घर सांभाळताना त्यांनी व्यवसाय करण्यासही सुरुवात केली होती.
6 / 9
घरची कामं आटोपल्यानंतर बाजारात दुकान मांडून खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, चपला विकून महिला कमाई करत. यातून कुटुंबातील खर्चाला हातभार लावण्यात महिलाही योगदान देत असत. त्यातूनच या वुमन मार्केटचा पाया रचला गेला.
7 / 9
मदर्स मार्केटमध्ये पिढ्यानपिढ्या अनेक महिला व्यवसाय करत आहेत. आजही या मार्केटमध्ये फक्त महिलाच सारंकाही नियोजन करतात.
8 / 9
मदर्स मार्केटमध्ये भाजी, कपड्यांपासून इतर सर्वच वस्तू मिळतात. मणिपूरच्या अनेक पारंपारिक वस्तूंची देखील येथे विक्री केली जाते. त्या खरेदी करण्यासाठी अनेक पर्यटक या मार्केटमध्ये येतात.
9 / 9
मणिपूरच्या या मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या महिला दरवर्षाला ७५ हजार ते ३ लाखांपर्यंतची कमाई करतात.
टॅग्स :MarketबाजारWomenमहिला