जबरदस्त! निवृत्ती दिवशी हेलिकॉप्टरमधून सफारी, ५ लाखात स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 20:26 IST
1 / 8राजस्थानच्या भिलवाडा येथे राहणाऱ्या महिला आरोग्य सेविकेचे स्वप्न निवृत्तीनंतर पूर्ण झाले. एका दिवस हेलिकॉप्टरमधून उड्डाण करेल, असे या महिलेचे स्वप्न होते. हे स्वप्न ५ लाखात पूर्ण झाले. सेवानिवृत्तीच्या दिवशी ड्युटी गावातून ‘फ्लाइंग कॉट’वर बसून महिला घरी पोहोचल्या.2 / 8राजस्थान येथील भिलवाडा जिल्ह्यातील मांडलगढ भागात, ब्लॉक मेडिकल आणि आरोग्य विभागात कार्यरत महिला आरोग्य अभ्यागत शांता जीनगर हेलिकॉप्टरमध्ये बसून मांडलगढ उपविभागातील श्यामपुरा गावातून भीलवाडा येथे पोहोचल्या.3 / 8राजस्थानमधील आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्यासाठी तिची निवृत्ती संस्मरणीय ठरली. शासकीय सेवेतून निवृत्तीनंतर कर्तव्य बजावणाऱ्या गावातील महिला कर्मचाऱ्याने हेलिकॉप्टरमध्ये बसून भिलवाडा गाठले. 4 / 8यादरम्यान हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्यामपुरा गावात बांधलेल्या हेलिपॅडवर पाहण्यासाठी उपस्थित होते.5 / 8महिला आरोग्य सेविकेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शांता या जेव्हा हेलिकॉप्टर आकाशात जाताना पाहत होत्या तेव्हा त्यांनाही हेलिकॉप्टरमध्ये बसावसं वाटायचे. त्यांची ही इच्छा आज पूर्ण झाली आहे.6 / 8शांता यांच्या सरकारी नोकरीतून निवृत्तीचा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी उदयपूरहून ५.५० लाख रुपयांचे हेलिकॉप्टर मागवण्यात आले. शांता देवी, त्यांची मुलगी आशा आणि नातू निखिल यांच्यासोबत शुभमनेही हेलिकॉप्टरमधून उड्डाण सफारी केली. 7 / 8हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यापूर्वी एलएचव्ही शांता यांच्या कुटुंबीयांनी व कर्मचाऱ्यांनी शासकीय आरोग्यकेंद्रापासून गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढली आणि त्यांना निरोप दिला.8 / 8निवृत्तीनंतर कुटुंबासह घरी जाताना शांता जिंगार.