शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: प्रदूषण नसल्यानं दिसलं पृथ्वीवरचं स्वर्ग...; व्हायरल फोटो बघाल तर बघतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 2:55 PM

1 / 11
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनहीच घोषण करण्यात आली आहे. त्यामुळे जास्त करून लोकांना घरात बंदिस्त व्हावं लागलं आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्यानं प्रदूषणातही कमालीची घट नोंदवली गेली आहे. तसेच गर्दीनं व्यापलेली पर्यटनस्थळसुद्धा आता माणसांविना नयनरम्य दिसत आहेत. मुंबईत पर्यटनस्थळ असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही माणसांसाठी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे तिथले प्राणी मुक्त विहार करत आहेत.
2 / 11
हिमाचल प्रदेशमधल्या बर्फानं आच्छादलेल्या एका पर्वताचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अशा निसर्गरम्य आणि माणसांची गर्दी नसलेल्या पर्यटनस्थळांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. प्रदूषण नसल्यानं असं वातावरण, असं सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत असलेली बुर्ज खलिफाही प्रदूषण नसल्यानं नयनरम्य दिसत आहे.
3 / 11
पॅरिसमधील ही एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची जगभरात प्रसिद्ध असलेली वास्तू आहे.
4 / 11
गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईचं प्रवेशद्वार असल्याचंही म्हटलं जातं. इथून माणसांची कायम वर्दळ असते. परंतु लॉकडाऊन असल्यानं ही स्थळही माणसांविना सुंदर दिसत आहे.
5 / 11
अमिरात स्टेडियम हे इंग्लंडमधल्या लंडनमधलं एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियमही प्रेक्षकांविना सुनसुनं पडलं आहे.
6 / 11
इटली देशाच्या पिसा शहरातील एक हा चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे.
7 / 11
रियो डी जनरिओ हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१६मध्ये इथे ऑलिंपिक खेळस्पर्धा झाल्यात. तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.
8 / 11
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील लिबर्टी आयलंडवर उभारण्यात आलेली ही एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ फ्रान्सकडून अमेरिकेला ही वास्तू देण्यात आली होती.
9 / 11
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे.
10 / 11
ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून, हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
11 / 11
चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरून मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरून बांधली गेली. ही भिंत अवकाशातून दिसत असल्यानं ती किती विशाल असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या