शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अग्गंबाई 'सासूबाई'! ११ सुनांनी सासूला बसवलं देव्हाऱ्यात, सोन्यानं मढवून रोज करतात पूजा

By मोरेश्वर येरम | Published: January 18, 2021 8:14 PM

1 / 8
सासू आणि सुनेचं नातं म्हणजे छत्तीसचा आकडा असं म्हटलं जातं. पण सासूच्या मृत्यूनंतर तिची प्रतिमा घरच्या देव्हाऱ्यात ठेवून तिची पूजा केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हो हे खरंय.
2 / 8
छत्तीसगढच्या विलासपूरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील सुनांकडून सासूबद्दलचं प्रेम व्यक्त करत तिची प्रतिमेची पूजा केली जातेय. इतकंच नव्हे, तर महिन्यातून एकवेळ सासूच्या प्रतिमेसमोर भजन किर्तन देखील केलं जातं.
3 / 8
विलासपूर जिल्ह्या मुख्यालयापासून किमान २५ किमी दूरवर रतनपूर येथील तांबोळी परिवारातील सुनांनी २०१० साली आपल्या सासूच्या प्रतिमेचं मंदिर घरात तयार केलं आहे.
4 / 8
एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या तांबोळी कुटुंबात एकूण ३९ सदस्य आहेत. तर एकूण ११ सुना आनंदानं कुटुंबात राहतात. या ११ सुनांची सासू गीता देवी यांचं २०१० साली निधन झालं होतं. सासू प्रतिच्या प्रेमापोटी या ११ सुनांनी आपल्या सासूची प्रतिमा घरात ठेवण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
एकत्र कुटुंब पद्धतीचा धडा देणाऱ्या गीता देवी यांनी दिलेल्या शिक्षणाचा वसा पुढे घेऊन जात तांबोळी कुटुंबातील सर्व सुना गीता देवी यांची पूजा करतात. सुनांनी आपल्या सासूच्या प्रतिमेला सोन्याचे दागिने देखील घातले आहेत.
6 / 8
गीता देवी या आपल्या सुनांवर अगदी मुलीप्रमाणे प्रेम करत होत्या. कोणताही निर्णय घेताना त्या आपल्या सुनांचं मत त्यावर जाणून घेत असत, असं तांबोळी कुटुंबिय सांगतात.
7 / 8
तांबोळी कुटुंबातील सर्व सुना सुशिक्षित असून सर्व पदवीधर आहेत. त्या सर्व जणी आपल्या पतीला त्यांच्या कामात मदतही करतात आणि घराचा आर्थिक डोलारा सांभाळतात. त्यांचे सासरे हे निवृत्त शिक्षक आहेत.
8 / 8
तांबोळी कुटुंबियांकडे हॉटेल, किराणा दुकान, पान दुकान आणि साबण तयार करण्याचा कारखाना आहे. एवढचं नाही, तर या कुटुंबाकडे २० एकर जमीन देखील आहे. त्यात शेती केली जाते.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Socialसामाजिक