शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump: एकेकाळी 'ताजमहाल'चे मालक होते डोनाल्ड ट्रम्प; पण दिवाळं निघालं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 1:14 PM

1 / 15
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. मात्र त्यांच्याकडे असा ताजमहल होता ज्याला ते जगातील आठवा अजूबा असं बोलायचे. मात्र अनेक सुविधांनी भरलेला हा अत्याधुनिक ताजमहल वाचवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अपयश आलं आणि त्यांचे दिवाळे निघाले
2 / 15
ट्रम्प यांच्या ताजमहाल कॅसिनोचं क्षेत्रफळ १ लाख २० हजार स्क्वेअर फूट होतं. यात ३,००९ मशीन होत्या तर १६७ गॅबलिंग टेबलदेखील होते. ज्यात जुगार खेळला जात होता.
3 / 15
या ताजमहाल कॅसिनोच्या उद्धाटन सोहळ्यात पॉपस्टार मायकल जॅक्सनने परफॉर्म्सही सादर केला होता. तसेच याठिकाणी २००५ मध्ये बॉलिवूड पुरस्कार सोहळाही पार पडला होता.
4 / 15
इतकचं नाही तर गायक एल्टन जॉननेही ट्रम्प यांच्या कॅसिनो आणि रिसोर्टला पाहुणे म्हणून येऊन आपली कला सादर केली होती.
5 / 15
मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना ताजमहाल कॅसिनो रिसोर्ट जास्त दिवस सांभाळता आला नाही, कॅसिनोच्या आर्थिक व्यवहारात घोळ होऊ लागला. १९९८ मध्ये अमेरिका सरकारने यावर ३४२ कोटींचा दंड लावला होता.
6 / 15
ताजमहाल कॅसिनोचं रिसेप्शन एरिया इतका मोठा होता जो एखाद्या एअरपोर्टच्या तिकीट बुकींग एरियासारखा दिसतो. इथे एकाचवेळी ५ हजार लोक उभे राहू शकत होते.
7 / 15
लिफ्टच्या लॉबीमध्ये एकाचवेळी १२ लिफ्ट होत्या. प्रत्येक लिफ्टला सोन्याचा रंग दिला होता. सर्व लिफ्टच्या दरवाजांना आणि आतील बाजूस २४ कॅरेट सोन्याचा मुलामा दिला होता.
8 / 15
कॅसिनो आणि रिसोर्टमध्ये काही विशेष रुमच्या बाथरुममधील नळ आणि बेसीन सोन्याच्या प्लेटने मढवल्या होत्या. साफसफाईसोबत याठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता.
9 / 15
डोनाल्ड ट्रम्प भारतीय संस्कृतीशी खूप प्रभावित होते. त्यामुळे त्यांच्या कॅसिनो आणि रिसोर्टचं नाव ताजमहाल दिलं होतं. येथील कर्मचाऱ्यांचा पेहरावही अरबी आणि भारतीय होता.
10 / 15
कॅसिनोच्या आतील भाग एखाद्या शाही महालापेक्षा कमी नव्हता. आकर्षक रोषणाई, कारपेट्स, झुंबर अशा महागड्या गोष्टी त्याठिकाणी होत्या.
11 / 15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताजमहालात कॅसिनो आणि रिसोर्टचे रुम्स लग्जरी आणि आकर्षक वस्तुंनी भरलेल्या होत्या. सोन्याच्या रंगाचे बेडवरील कुशन्सही रुममध्ये पाहायला मिळत होते.
12 / 15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर ताजमहाल कॅसिनो आणि रिसोर्टचे वाईट दिवस सुरु झाले.
13 / 15
२०१५ मध्ये अमेरिका प्रशासनाने ट्रम्प यांच्यावर ७१.८६ कोटी दंड लावला, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आर्थिक डबघाईला आले.
14 / 15
२०१६ मध्ये ताजमहाल कॅसिनो आणि रिसोर्ट अमेरिका सरकारकडून लिलावात काढण्यात आला.
15 / 15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर ताजमहाल कॅसिनो आणि रिसोर्टचे वाईट दिवस सुरु झाले.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाTaj Mahalताजमहाल