२०२४ मध्ये मतदान न केल्यास बँक खात्यातून ३५० रुपये कापले जाणार? जाणून घ्या सत्य By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 5:13 PM
1 / 10 मतदानाचा टक्का वाढावा, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रयत्न केले जातात. 2 / 10 मतदान केंद्रावरील सुविधा वाढवण्यासोबतच मतदार यादी अपडेट ठेवण्याचं, जनजागृती करण्याचं काम निवडणूक आयोगाकडून करण्यात येतं. मात्र तरीही बरेचसे मतदार मतदान करत नाहीत. 3 / 10 अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात. मतदान केंद्र जवळ असूनही मतदानाचा हक्क न बजावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 4 / 10 बहुसंख्य मतदार मतदान करत नसल्यानं २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 5 / 10 २०२४ मध्य होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्या बँक खात्यातून ३५० रुपये कापले जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 6 / 10 २०२४ च्या निवडणुकीत एखाद्या मतदारानं मतदान न केल्यास आधारकार्डच्या माध्यमातून त्याची ओळख पटवली जाईल. याच कार्डला लिंक असलेल्या त्याच्या खात्यातून ३५० रुपये कापले जातील, असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 7 / 10 निवडणूक आयोगानं यासंदर्भात सर्व बँकांना सूचना दिल्या असल्याचं वृत्त व्हायरल झालं असून त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रवक्यांच्या विधानाचाही संदर्भ देण्यात आला आहे. 8 / 10 मतदान यंत्रणा उभारण्यासाठी निवडणूक आयोग बराच खर्च करतो. मात्र कोट्यवधी लोक मतदान करत नसल्यानं हा खर्च वाया जातो. त्यामुळेच हे पाऊल उचलण्याचा दावा केला जात आहे. 9 / 10 निवडणूक आयोगानं या प्रकरणात आधीच न्यायालयाची परवानगी घेतली आहे. कोणीही न्यायालयात धाव घेऊ नये यासाठी आयोगानं खबरदारी घेतल्याची माहिती व्हायरल मेसेजमध्ये आहे. 10 / 10 केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनं मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. व्हायरल मेसेज पूर्णपणे तथ्यहीन असल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. आणखी वाचा