शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला; शेतकऱ्याला सोने-रत्नांचा मोठा खजिना सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 9:23 AM

1 / 10
जमिनीत खोदकाम करताना अनेकदा खजिना सापडल्याचं आपण सिनेमात पाहतो, पण रिअल लाइफमध्येही अशाप्रकारे जर एखाद्याला खजिना सापडला तर काय होईल, अनेकदा अशाप्रकारच्या बातम्या समोर येत असतात.
2 / 10
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद येथे एका शेतकऱ्याला शेत नांगरताना सोने आणि बरीच रत्ने सापडली. ही कहाणी फिल्मी वाटेल पण खरी आहे. एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याला जमिनीच्या खालून अनेक कलाकृती सापडल्या
3 / 10
हा सर्व खजिना सोने, चांदी आणि तांब्याचा आहे. येरगडापल्ली गावचा शेतकरी याकूब अली पिकाची पेरणीसाठी शेतात नांगरणी करीत होते. तेच तेव्हा त्यांना जमिनीखाली सोने आणि अनेक रत्ने मिळाली.
4 / 10
शेतात नांगरणी करताना याकूब अलीच्या नांगराला काहीतरी धडकले. मग त्याने ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याकूब अलीने नीट पाहिले, तेव्हा त्याला धक्का बसला.
5 / 10
सुरुवातीला त्यांना पितळेची तीन भांडी मिळाली. ज्यात दागिने भरले होते. नंतर आणखी अनेक गोष्टी त्या भांड्यामध्ये सापडल्या.
6 / 10
याबंद अलीने तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच तेथे गर्दी होती. हे खरं आहे की खोटं पाहण्यासाठी गावकऱ्यांनीही गर्दी केली.
7 / 10
महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातून जहीराबादसाठी रोड जातो, औरंगाबाद निजामांची पहिली राजधानी असायची. जगातील सर्वात श्रीमंत निजाम येथे राहत होते.
8 / 10
कोहिनूर हिराची उत्पत्ती गोलकोंडा येथील खाणींमधून झाली. शेतकर्‍याला जमिनीतून मिळालेल्या या वस्तू निजाम काळातील असण्याची दाट शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
9 / 10
पोलिसांनी सांगितले की आतापर्यंत उत्खननात २५ सोन्याची नाणी, गळ्यातील दागिने, अंगठ्या, पारंपारिक भांडी सापडली आहेत. जे पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आले आहे.
10 / 10
हे दागिने, सोन्याची नाणी, धातूची भांडी कोणत्या युगातील आहेत हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. तपासणीनंतरच योग्य माहिती मिळेल
टॅग्स :Farmerशेतकरी