Girl called Ratan Tata Chhotu business tycoon gave this answer
बडे दिलवाला! रतन टाटा यांना सोशल मीडियावर मुलगी म्हणाली 'छोटू', त्यांनी दिलेल्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन.... By अमित इंगोले | Published: January 15, 2021 11:08 AM1 / 11कधी आपल्या चांगल्या कामांमुळे तर कधी आपल्या जुन्या फोटोंमुळे देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतात. 2 / 11आता पुन्हा एकदा त्यांच्या दिलदारपणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका मुलीने त्यांच्या फोटोवर अशी काही कमेंट केली होती की, लोक तिला ट्रोल करू लागले होते. 3 / 11मात्र, नेहमी आपल्या दिलदारपणासाठी फेमस असलेल्या रतन टाटा यांनी तिच्या कमेंटला उत्तर देऊन सर्वांचं मन जिंकलं आहे. 4 / 11टाटा ग्रुप ऑफ चेअरमनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यानिमित्ताने त्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर लोकांचे लाइक्स आणि कमेंटचा पाऊस आला होता. 5 / 11तर एका मुलीने या रतन टाटा यांच्या फोटोवर 'छोटू' अशी कमेंट केली होती. त्यानंतर लोकांनी या मुलीला ट्रोल करणं सुरू केलं होतं.6 / 11इथे आपला दिलदारपणा दाखवत रतन टाटा यांनी मुलीचा ट्रोलर्सपासून बचाव केला आणि तिच्या कमेंटवर फार प्रेमाने उत्तर दिलं. 7 / 11त्यांनी रिप्लाय केला की, 'आपल्या सर्वांमध्ये एका लहान मुलाचे गुण असतात. कृपया या मुलीचा आदर करा'. नंतर या मुलीने तिची कमेंट डिलिट केली. 8 / 11रतन टाटा यांनी लिहिले की, एका इनोसंट महिलेने काल मला लहान मुल म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.9 / 11आपल्या या कमेंटमुळे त्या मुलीला लोकांकडून अपमान सहन करावा लागला. ज्यावरून हे दिसून येतं की, रतन टाटा यांना लोक किती पसंत करतात. 10 / 11अखेर तिने आपली कमेंट डिलिट करणंच योग्य समजलं. रतन टाटा यांनी लिहिले की, ते तिच्या भावनात्मक नोटचा आदर करतात. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, ती मुलगी पुन्हा अशी कमेंट करेल.11 / 11रतन टाटा हे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इन्स्टाग्रामवर आले होते. फार कमी वेळात ते सोशल मीडियाच्या खेळात तरबेज झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications