government warns on fake viral Whatsapp message of Ebola Virus in Cold Drink
कोल्ड ड्रिंक्समध्ये आहे इबोला व्हायरस? WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेजमागचं सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 12:53 PM1 / 9WhatsApp वर विविध प्रकारचे प्रकारचे मेसेज हे दररोज व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा फेक मेसेज हे असतात. पण युजर्सना ते खरे वाटतात. पण प्रत्यक्षात सत्य वेगळंच असतं. 2 / 9सोशल मीडियावर असाच एक मेसेज पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे, ज्या मेसेजमध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये इबोला व्हायरस असल्याचा मोठा दावा केला जात आहे.3 / 9मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की कोल्ड ड्रिंकमध्ये इबोला व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही ते पिऊ नका. हा मेसेज सरकारच्या नावाने फॉरवर्ड केला जात आहे.4 / 9पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं आहे. सरकारने असा कोणताही इशारा दिलेला नाही, असं पीआयबीने स्पष्ट केलं आहे.5 / 9असे फेक मेसेज WhatsApp वर अनेकदा येतात. अनेक वेळा हॅकर्स याच संधीचा फायदा घेऊन तुम्हाला फसवू शकतात, जाळ्यात ओढू शकतात.6 / 9WhatsApp वर येणाऱ्या अशा मेसेजेसबाबत तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नेहमीच आलेल्या मेसेजचा सोर्स सर्वप्रथम व्हेरिफाय करा. 7 / 9अनेक वेळा तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून हा मेसेज मिळेल. अशा दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी, तुम्ही त्या दाव्याबद्दल इंटरनेटवर शोधू शकता.8 / 9मेसेजसोबत येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका. असे करून तुम्ही फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू शकता. लिंकमध्ये काही मालवेअर देखील असू शकतात.9 / 9अनोळखी लिंकवर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका. तुम्हाला कोणताही संशयास्पद मेसेज मिळाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. नेहमी सतर्क राहा. आणखी वाचा Subscribe to Notifications