नाद खुळा! ना घोडा, ना कार थेट 'जेसीबी'वरून नवरदेवाची वरात मंडप दारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 14:00 IST
1 / 7आधुनिक काळात विवाह म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे शक्तिप्रदर्शन होत आहे. लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो. आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार नवीन नाही. पण, गुजरातमधील नवसारी (Navsari) येथे एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. 2 / 7नवसारी येथे घोडी किंवा गाडीने जाण्याऐवजी नवरदेवाने जेसीबीवर वरात काढली. हा अनोखा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. तोडफोड किंवा खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबीमध्ये बसून नवरदेव जेव्हा लग्नस्थळी पोहोचले, तेव्हा हे दृश्य पाहून वधूच्या बाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले. 3 / 7गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कालियारी गावातील वरात चर्चेचा विषय बनली आहे. येथे केयुर पटेल नावाच्या नवरदेवाची लग्नाची वरात परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.4 / 7जेसीबी मशीन फुलांनी सजवण्यात आले होते. ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर नाचत लग्नाची वरात वधूच्या घरी पोहोचली. नवरदेव जेसीबीमध्ये बसून बाहेर आला तेव्हा रस्त्यावरून जाणारे त्याकडे आणि जेसीबीकडे बघतच राहिले. 5 / 7नवरदेव केयूर पटेल यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पंजाबमधील एका लग्नाचा व्हिडिओ पाहिला होता. ज्यामध्ये एक नवरदेव जेसीबीमध्ये लग्नासाठी आला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच केयूर पटेल यांनी आपणही जेसीबीमधून वरात काढण्याचा निर्णय घेतला.6 / 7अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यात विमान, हेलिकॉप्टर, जहाज यासह अनेक वाहनांचा वापर करून श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. यासंबंधीचे व्हिडिओ सुद्धा अनेकदा सोशल मीडियावर समोर येत असतात. त्यात आता जेसीबीही सामील झाला आहे.7 / 7जेसीबीमध्ये वरात काढण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.