शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' तरुणीला पाहून भलेभले थरथर कापतात; मॉडेल नव्हे तर लेडी डॉन म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 9:11 PM

1 / 10
गुजरातच्या सूरत इथं एका महिला डॉनची खूप दहशत आहे. सर्वसामान्यांपासून अगदी उद्योगपतीपर्यंत अनेकजण तिच्या दहशतीखाली वावरतात. परंतु या लेडी डॉनची सुंदरता पाहिली की कुणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्हालाही विश्वास होणार नाही इतकी सुंदर आणि मॉडेलसारखी दिसणारी ही मुलगी लेडी डॉन आहे.
2 / 10
होठांवर लाल लिपस्टिक, डोळ्यात काजळ आणि चष्मा घालून ती फिरत असते. या लेडी डॉनचं नाव आहे अस्मिता गोहिल उर्फ भूरी. या लेडी डॉनला पाहणारे तिला पाहतच बसतील परंतु जेव्हा तिच्या या सुंदर चेहऱ्यामागचा क्रूर दहशत माजवणारा चेहरा समोर आला की भल्याभल्यांची बोलती बंद होते.
3 / 10
गुजरातच्या सूरत इथं जेव्हा ही गल्लीतून जाते तेव्हा दुकानदारांचे अंग थरथर कापते. सुरतच्या वराछा परिसरात या लेडी डॉनची दहशत आहे. भूरीची दहशत इतकी पसरली आहे की, कुणीही तिच्याविरोधात तोंड उघडण्याची हिंमतही करू शकत नाही.
4 / 10
ही सुंदर लेडी डॉन केवळ गुंडगिरी करत नाही तर फेसबुकवरही सक्रीय आहे. फेसबुकवर तिचे १३ हजाराहून जास्त फोलोअर्स आहे. तिच्या फेसबुक अकाऊंटवर ती अनेक फोटो अपलोड करत असते. हे फोटो पहिल्यांदा पाहणाऱ्या व्यक्तीला ती एखादी सुपर मॉडेल आहे असेच वाटेल.
5 / 10
कुठल्या फोटोत ती बंदूक घेऊन दिसते तर कुठल्या फोटोता क्रुजर बाईक चालवताना आढळते. अस्मिता ही गुजरातच्या उना येथील राहणारी आहे. लेडी डॉन भूरीनं सुरतच्या दुकानदारांशी भांडलेले ३ व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 10
एका व्हिडीओत वराछा परिसरातील एका पानवाल्या दुकानदाराला हातात तलवार घेऊन धमकावत असल्याचं दिसून येते. बळजबरीनं खंडणी मागून अनेकांवर ती दहशत निर्माण करत असते. याआधीही तिचे अनेक व्हिडीओ हातात तलवार घेऊन गुंडगिरी करत असल्याचं दिसून आले आहे.
7 / 10
पोलिसांनी अनेकदा तिला अटक केली आहे. परंतु जामीनावर बाहेर येत तिचं हे काम सुरुच राहतं. पोलिसांनी भूरी आणि तिच्या टोळीवर दहशत निर्माण करणे, खंडणी असे विविध गुन्हे नोंद केलेत. सुरतसह अन्य जिल्ह्यात भूरीविरोधात ९ गुन्हे नोंद आहेत.
8 / 10
अवघ्या २३ वर्षाची अस्मिता उर्फ भूरी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करते. त्याचसोबत ती खूप स्टायलिश राहते. महागड्या गाड्यांमध्ये फिरते. हातात बंदूक आणि तलवार घेतलेले अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल करते.
9 / 10
अनेक लोकांना भूरीनं आतापर्यंत बेदम मारलं आहे. इतकचं नाही अस्मितावर एका हत्येचा गुन्हाही नोंद आहे. ती जेलमध्ये गेली आहे. तसेच तिच्यावर हिंसाचार भडकवण्याचाही आरोपही आहे. पोलिसांनी अनेकदा तिला अटक केली परंतु जामिनावर परत ती बाहेर येते. घरच्यांनीही तिच्यापासून लांब राहणं पसंत केले आहे.
10 / 10
अस्मिता गोहिलला भूरी नावानं ओळखलं जातं. कारण ती ज्या भूरा नावाच्या इसमाची गर्लफ्रेंड आहे तो कुख्यात गुंड आहे. अस्मिताही तिच्या बॉयफ्रेंडप्रमाणेच कुख्यात आहे. तिचे हजारो फॉलोअर्सही आहेत. परंतु तिच्याविरोधात कुणीही बोलण्याची हिंमत करत नाही.
टॅग्स :Gujaratगुजरात