शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिमालयातला दुर्मीळ हिम बिबट्या कधी पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 4:43 PM

1 / 5
हिमाचल प्रदेशच्या हिक्कीम गावात एक कुटुंबाला हिम बिबट्याचे दर्शन झाले आहे. या हिम बिबट्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हिम बिबट्या हा सहजरीत्या नजरेत पडत नाही.
2 / 5
कारण हा प्राणी चपळ असतो. वन्यजीव तज्ज्ञ हिम बिबट्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात. बऱ्याचदा कॅमेरे लावूनही हिम बिबट्याला कैद करता येत नाही.
3 / 5
स्पिती व्हॅली हा भूप्रदेश हिम बिबट्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याचे भागाचे संवंर्धन करण्याचे राज्याच्या वन्यजीव संवर्धन विभागाचे प्रयत्न आहेत.
4 / 5
त्यासाठी विभागाने बिबट्यांवर संशोधन आणि त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने साधनसुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. कोल्ड डेझर्ट म्हणून ओळख असलेली स्पिती व्हॅली हिमालयात, जम्मू काश्मीरच्या लडाखचा भूभाग आणि स्पीती तसेच, हिमाचल प्रदेशातील अप्पर किन्नौर भागात येतो.
5 / 5
कोल्ड डेझर्ट म्हणून ओळख असणाऱ्या या सांस्कृतिक भूभागाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
टॅग्स :leopardबिबट्या