शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता माझी सटकली...! नाळ कापताना बालिकेने असे काही पाहिले; डॉक्टरच शॉक झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 2:31 PM

1 / 11
नवजात अर्भकाच्या जन्मानंतर डॉक्टर सर्वात आधी रडवतात. कारण ते बालक स्वस्थ आहे किंवा त्याचे फुफ्फुस नीट काम करतेय का हे पाहतात. यानंतर त्याची आईशी जोडलेली नाळ तोडून टाकतात. ब्राझीलमध्ये असे करताना आश्चर्याचा धक्का डॉक्टरांना बसला आहे.
2 / 11
डॉक्टरांनी रिओ दी जानेरोमधील एका हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. मूल आईच्या गर्भाशयातून बाहेर आल्यानंतर प्रकाशाशी पहिल्यांदाच समोरे जात असल्याने डोळे उघडत नाही. पण इथे मोठा धक्कादायक प्रकार घडला आहे.
3 / 11
आईच्या गर्भाशयातून मूल बाहेर येताच त्याला रडविण्यासाठी चापटी मारलेले आपण सिनेमांमध्ये बऱ्याचदा पाहिले आहे. यानंतर ते मूल रडायला लागते आणि डॉक्टरांसह सगळेच सुटकेचा निश्वास सोडतात.
4 / 11
त्या बालकाची आईही तो पहिला आवाज ऐकण्यासाठी आतुरलेली असते. तिने प्रचंड वेदना सहन केलेल्या असतात.
5 / 11
ब्राझीलमधील या हॉस्पिटलमध्ये 13 फेब्रुवारीला एका मुलीचा जन्म झाला. मात्र, ती रडली नाही. डॉक्टरांनी तिला रडविण्यासाठी तिच्या पार्श्वभागावर चापटी मारून पाहिली. मात्र, तिने डॉक्टरांकडे अशा मुद्रेने पाहिले की डॉक्टरांना क्षणभर भीतीच वाटली.
6 / 11
हॉस्पिटलच्या स्टाफने या अर्भकाच्या पाहण्याचे फोटो आणि व्हीडिओ घेतले आहेत. डॉक्टरांनी रडविण्याचा प्रयत्न करताच मुलीने त्यांच्याकडे रागाने पाहिले.
7 / 11
बालिकेने त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहिल्याने डॉक्टर हैरान झाले. तिने जणू काही नाखुशीच व्यक्त केली होती.
8 / 11
डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही मुलाचे असे हावभाव पाहिलेले नाहीत. मात्र नाळ कापल्यानंतर ही मुलगी रडू लागली.
9 / 11
या बालिकेचा फोटो हॉस्पिटलने शेअर केला आहे. महिलेचे सी सेक्शन करण्यात आले होते.
10 / 11
हा क्षण खूप सुंदर आणि कायम लक्षात राहणारा असेल असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
11 / 11
तिच्या पालकांनी बालिकेचे नाव परेरा डी जीजस ठेवले आहे.
टॅग्स :Brazilब्राझीलdoctorडॉक्टरPregnancyप्रेग्नंसी