शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! आकाशात उडणारे हजारो पक्षी अचानक जमिनीवर पडले; रहस्यमय Video नं सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:58 PM

1 / 10
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. मग, यातील काही व्हिडीओ प्राण्यांचेही आहेत. अनेक व्हिडिओ खूप धोकादायक असतात, तर काही व्हिडिओ पोट धरून हसवतात. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.
2 / 10
असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा व्हिडिओ उत्तर अमेरिकेतील मेक्सिकन येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
3 / 10
तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, हजारो पक्षी अचानक आकाशातून जमिनीवर पडतात. प्रत्यक्षात काय घडले याची कोणालाच कल्पना नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या संख्येने पक्षी एकाच वेळी आकाशातून कसे पडले?
4 / 10
पिवळ्या रंगाचे शिर असलेले शेकडो काळे पक्षी आकाशातून पडताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यात डझनभर पक्षीही मेले. उत्तरेकडील मेक्सिकन शहर क्युटेमॉकमधील सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झालेले धक्कादायक फुटेज पक्ष्यांचा कळप मोठ्या उंचीवरून रस्त्यावर पडताना दाखवतो. काही पक्षी पडल्यानंतर लगेच उडून गेले.
5 / 10
मेक्सिकन वृत्तपत्र एल हेराल्डो डी चिहुआहुआने वृत्त दिले की, अनेक स्थानिकांनी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी कुओटेमोकच्या रस्त्यांवर आणि फुटपाथवर अनेक पिवळ्या अन् काळसर रंगाचे पक्षी मृत पडलेले पाहिले. आकाशातून पडलेले 100 हून अधिक पक्षी मृत्यूमुखी पडल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितले.
6 / 10
दरम्यान, या गूढ घटनेने सोशल मीडियावर 5G तंत्रज्ञानाला दोष देऊन अटकळ पसरवली आहे, तर पशुवैद्य प्रदूषणाच्या वाढत्या पातळीला दोष देत आहेत. काहींनी तर पक्ष्यांना विजेचा झटका बसल्याचा अंदाजही व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
7 / 10
हा व्हिडिओ ट्विटर पेज @RT_com वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, हा खूपच धक्कादायक व्हिडिओ आहे. माझ्या आयुष्यात मी असं कधी पाहिलं नाही.
8 / 10
तर तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, यापैकी बहुतेक पक्ष्यांवर कोणीतरी हल्ला केला आहे आणि त्यामुळेच हे सर्व पक्षी अचानक आकाशातून खाली पडले आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी आकाशातून खाली का पडले हे सर्वांसाठी न उलगडणारं कोडं बनलं आहे.
9 / 10
भारतात नजीकच्या भविष्यात येऊ घातलेल्या ‘५ जी’ तंत्रज्ञानामुळे निव्वळ माणसालाच नव्हे तर एकूण जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत अनेक संघटना कोर्टात गेल्या आहेत. खरोखरच या तंत्रज्ञानामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
10 / 10
सोशल मिडियावर काही वर्षांपूर्वी एक कटिंग शेअर करत दावा केला होता की, ५ जी टेस्टिंगमुळे जवळपास २९७ पक्षांचा मृत्यू झाला होता. मात्र ५ जी रेडिएशनमुळे पक्षांवर थेट परिणाम होऊ शकत नाही. अद्याप यावर ठोस पुरावा नाही असं फोर्टिस मेमोरिएल रिसर्च इन्स्टिट्यूटचे रेडियोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉ. राधाकृष्णन यांनी सांगितले होते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल