शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय महिलांकडे जगात सर्वाधिक सोनं! अमेरिका, रशिया, चीन कोसो दूर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:16 AM

1 / 8
सोनं ही अशी गोष्ट आहे, ज्याचं जगभरातल्या लोकांना आकर्षण आहे. त्यातही भारत आणि भारतातल्या महिलांसाठी तर सोनं म्हणजे जीव की प्राण.
2 / 8
भारतीयांसाठी सोनं म्हणजे नुसता दागिना नाही, अडीनडीला उपयोगी पडणारा आणि लगेच पैशांत रूपांतर करून देणारा धातू नाही, तर सोनं म्हणजे भारतीय महिलांसाठी संस्कृती आहे, संस्कार आहे.
3 / 8
त्यामुळे कुठल्याही शुभमुहूर्तावर भारतातल्या महिला आवर्जून सोनं, दागिने खरेदी करतात. सध्या जगभरात सगळ्याच देशांकडून सोन्याचा साठा शासकीय स्तरावर वाढवला जात आहे.
4 / 8
अमेरिकेकडे सध्या सुमारे ८१३३ टन सोनं आहे, जर्मनीकडे ३३६२ टन, तर सिंगापूरकडे १२७ टन.
5 / 8
मार्च २०२४च्या आकडेवारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सुमारे ८२२ टन सोनं आहे; पण भारतीय महिलांकडे किती सोनं असावं?
6 / 8
एका अभ्यासानुसार भारतीय महिलांच्या अंगावर २१,७३३ टन सोनं आहे! जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे.
7 / 8
भारतीय महिला - २१, ७३३ टन, अमेरिका - ८१३३ टन, जर्मनी - ३३६२ टन, इटली - २४५१ टन, फ्रान्स - २४३६ टन, रशिया - २२९८ टन, चीन - १९४८ टन, सिंगापूर - १२७ टन.
8 / 8
संदर्भ : फिनॉलॉजी
टॅग्स :GoldसोनंIndiaभारत