शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होऊ दे चर्चा! तब्बल २ किलो सोन्याचे दागिने अंगावर घालून हा पठ्ठ्या विकतोय कुल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:59 PM

1 / 10
महाराष्ट्रात आपण गोल्डमॅनची चर्चा बरीच ऐकली असेल. हातात, गळ्यात कोट्यवधीचं सोनं परिधान करून सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात फिरताना हे गोल्डमॅन दिसतात. गोल्डमॅनचे अनेक रिल्सही व्हायरल होतात. परंतु इंदूर शहरात सध्या एका गोल्डमॅनची चर्चा होतेय ती इतर गोल्डमॅनपेक्षा वेगळी आहे.
2 / 10
हा गोल्डमॅन दुसरा तिसरा कुणी नसून चक्क सराफा बाजारात कुल्मी विकणारा आहे. त्याचे नाव बंटी यादव असं आहे. त्याला लहानपणापासून सोन्याची आवड आहे. त्यामुळे अंगात किलोभर सोनं घालून हा पठ्ठ्या त्याचे कुल्फीचं दुकान चालवतो.
3 / 10
कुल्फीवाल्या गोल्डमॅनची ही चर्चा शहरात पसरली आणि दूर दूरहून कुल्फी खाण्याची रांग त्याच्या दुकानाबाहेर लागते. मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे कुल्फी खायला येतात आणि आवडीने त्याच्यासोबत सेल्फी काढून सोशल मीडियात पोस्ट करतात.
4 / 10
बंटी यादव इंदूरच्या सराफा चौपाटी भागात त्याचे दुकान लावतो. सराफा बाजारात दिवसाला सोने-चांदीच्या व्यवहारांची उलाढाल होते. याच बाजारात कुल्फी विकून त्यांना सोने खरेदीचा छंद जडला.
5 / 10
दरवर्षी किमान एकतरी सोन्याचे दागिने खरेदी करून तो त्याच्या शरीरावर घालतो. सध्या या कुल्फीवाल्या गोल्डमॅनकडे तब्बल २ किलो सोन्याचे दागिने आहेत. हे सर्व दागिने तो घरी ठेवत नाही तर अंगावर सोन्याचे दागिने घालून तो कुल्फी विकायला सराफा बाजारात दुकानावर येतो.
6 / 10
बंटी यादवनं त्याच्या अंगावर सोने घालण्याची सुरुवात अंगठीपासून केली. सर्वात आधी सर्व बोटांमध्ये अंगठी घातली, त्यानंतर गळ्यात चैन, हातात कडे असं एक एक करून तो दागिने बनवत गेला. आता त्याच्या गळ्यात १, २ नव्हे तर ६ पेक्षा अधिक चैन, हातात सोन्याचे कडे आणि ब्रेसलेट आहे.
7 / 10
इतकं करूनही बंटीचे मन भरले नाही म्हणून की काय बंटी यादवनं त्याचा दातही सोन्याचा केला आहे. एकदा बंटीचा दात तुटला होता. तेव्हा सोन्याची आवड असलेल्या बंटीने सोन्याचा दात बनवून तो लावला.
8 / 10
बंटी यादव याच्या कुल्फीचा स्वादही लोकांना आवडतो. त्यामुळे कुल्फीचा आनंद घेतात त्याचसोबत गोल्डमॅनसोबत फोटो काढण्यासाठी दुकानावर गर्दी करतात. त्यामुळे बंटीचा कुल्फीचा धंदाही जोरदार सुरू आहे.
9 / 10
बंटी लहानपणी एका सराफा दुकानात काम करत होता. तेव्हापासून त्याला सोन्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर याच बाजारात तो कुल्फी विकायला लागला. इतके सोने घालूनही त्याला कुठलीही अडचण होत नाही असं तो सांगतो.
10 / 10
रात्री १२ पर्यंत बाजारात व्यवहार सुरू असतात. त्यामुळे काहीच टेन्शन नाही. तर दुकान बंद करून घरी जाताना त्याच्यासोबत दुकानातील कर्मचारीही असतात. त्याशिवाय दुकानाजवळच पोलीस चौकी असल्याचे बंटीने म्हटलं.
टॅग्स :Goldसोनं