1 / 10नोकरी करण्यासाठी वयाची अट नसते, तर मनात जिद्द असायला पाहिजे, असे म्हणतात. स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या पॉल मार्क्स यांनी वयाच्या ६० वर्षी नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नातून हे सिद्ध होत आहे.2 / 10कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्याान पॉल मार्क्स यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतर वाढत्या वयामुळे त्यांना कोणतेही काम मिळत नव्हते. 3 / 10मात्र, पॉल मार्क्स यांनी हार मानली नाही आणि ६० व्या वर्षी ते किती फिट आहे, हे सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावर त्यांनी आपला पुशअप करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांना नोकरीची संधी दिली आहे.4 / 10लंकाशायरमधील रहिवासी असलेले पॉल मार्क्स पाच महिन्यांपूर्वीपर्यंत दुबईतील क्रेओल ग्रुपमध्ये मुख्य ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. 5 / 10मात्र, कंपनीने लॉकडाऊनमुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकले. यानंतर पॉल मार्क्स यांनी भारत, युएई, ब्रिटन आणि स्पेन यासारख्या देशातील नोकरीसाठी अर्ज केला. पण, त्यांना वयामुळे कोणतेही काम मिळाले नाही.6 / 10पॉल मार्क्स यांना हे सिद्ध करावे लागले की, ६० व्या वर्षीही ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. यासाठी त्यांनी लिंक्डइनवर एक व्हिडिओ पोस्ट केला. 7 / 10या व्हिडिओमध्ये त्यांनी सूट-बूट परिधान करून पुशअप्स मारत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत असून आता त्यांच्याकडे बऱ्याच नोकरीच्या ऑफर येत आहेत.8 / 10दररोज ५० पुशअप्स मारतो आणि आठवड्यात ३० किमी धावतो, असे पॉल मार्क्स यांनी सांगितले. तसेच, वय कधीही क्षमता किंवा उत्पादकतेचे मोजमाप असू शकत नाही, असे पॉल मार्क्स म्हणाले.9 / 10याचबरोबर, ६० वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीने आपला दिवस वर्तमानपत्र वाचण्यात किंवा टीव्ही पाहण्यात घालवला पाहिजे असे नाही, असेही पॉल मार्क्स यांनी सांगितले.10 / 10पॉल मार्क्स यांचा हा व्हिडिओ लिंक्डनवर बर्याच लोकांनी पाहिला आहे. अनेक कंपनी मालकांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली आहे, तर ५० पेक्षा जास्त कंपन्यांनी व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी त्यांचा सीव्ही नाकारला होता.