३९७ वर्षांनी अंतराळात दिसणार अद्भूत नजारा; पुन्हा पाहण्यासाठी ६० वर्ष वाट पाहावी लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 3:04 PM1 / 6येत्या २१ डिसेंबरला अंतराळात एक चमत्कार पाहायला मिळणार आहे. असा चमत्कार याआधी १६२३ दिसून आला होता. या दुर्मिळ खगोलिय घटनेत बृहस्पती आणि शनि एकाच दिवशी एकमेकांच्या जवळ आलेले दिसून येतात. 2 / 6यादरम्यान हा चमत्कार ताऱ्यांसारखा दिसत असल्यामुळे लोकांनासुद्धा पाहता येईल. हा अनोखा योग जवळपास ३९७ वर्षांनी दिसणार आहे. जर तुम्ही या वर्षी असा योग पाहिला नाही तर पुढची ६० वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागले. 3 / 6१६२३ नंतर हे दोन ग्रह इतक्या जवळ आले आहेत. त्यांना एक 'एक महान योग' म्हटलं जात आहे. एम. पी बिड़ला तारामंडळाचे प्रमुख देबी प्रसाद दुआरी यांनी सांगितले की, हा दुर्मिळ योग हजारो वर्षांनी एकदा तयार होतो. 4 / 6ते म्हणाले, 'जर पृथ्वीवरुन दोन खगोलिय पिंड एकमेकांजवळ दिसू लागले तर त्याला एक संयोग म्हणतात आणि जर शनी आणि बृहस्पतीचे असे संयोजन तयार झाले तर हा एक महा संयोग असतो.'5 / 6२१ डिसेंबरला रात्री या दोन ग्रहांचे भौतिक अंतर जवळपास ७३५ मिलियन किमी असेल. त्यानंतर १५ मार्च २०८० ला असा नजारा पुन्हा पाहायला मिळेल. 6 / 6२१ डिसेंबरला भारतातील प्रमुख शहरात सुर्यास्तानंतर एक अद्भूत नजारा लोकांना आपल्या डोळ्यांनी पाहता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications