Kerala trans couple who went viral for their maternity photoshoot this couple blessed with a baby
Ziya Paval and Zahad Fazil: 'तो' आई झाला; 'ट्रान्स' जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन, इन्स्टावरून दिली Good News! By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 7:25 PM1 / 9केरळचे ट्रांन्सजेंडर कपल झिया पावल आणि झहाद फाजिल यांनी अलीकडेच सोशल मीडियावरून आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. या जोडप्याने इस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले होते. अशातच आता हे अनोखे जोडपे आई बाबा झाले आहे. 2 / 9कोझीकोड मेडीकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या टिमने सांगितले होते की, या जोडप्यांची गर्भधारणा करण्यात कोणतेही आव्हान नाही. कारण दोघांनीही लिंग परिवर्तन केले आहे. 3 / 9झिया आणि झहाद हे दोघे मागील 3 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. झिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. तर झहाद स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला. या जोडप्याने मिल्क बँकेतून बाळाला आईचे दूध पाजण्याचा निर्णय घेतला.4 / 9भारतातील मुलाला जन्म देणारा झहाद हा पहिला ट्रान्समॅन असेल, असा दावा आता केला जात आहे.5 / 9भारतातील पहिली ट्रान्समॅन प्रेग्नंन्सी असल्याच्या बाबतीत, झिया आणि झहाद यांना अनेक अभिनंदन संदेश आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा मिळाल्या होत्या. 6 / 9झिया पावलने इस्टाग्रामवर फोटो शेअर करून आई झाल्याची बातमी दिली. झियाने स्वप्नपूर्ती झाल्यानंतर एक पोस्ट करून देवाचे आभार मानले. 7 / 9हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान झहादचे स्तन काढण्यात आले होते. तिचे गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाहीत. यामुळे त्यांना आता गर्भधारणा करता आली आहे.8 / 9झियाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नाही. माझ्या आत एक स्त्री होती. मलाही मूल होईल आणि ते मला 'आई' म्हणेल', असे तिचे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले आहे. 9 / 9मनोरमामधील रिपोर्टनुसार, या जोडप्याने आधी एक मूल दत्तक घेण्याची योजना आखली होती. तसेच संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली. परंतु कायदेशीर कारवाई त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होती, कारण ते एक ट्रान्सजेंडर जोडपे होते. सध्या यांचे फोटोशूट खूप व्हायरल होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications