Know, why gas cylinders color is red?
जाणून घ्या, घरातील गॅस सिलेंडरचा रंग लाल का असतो? By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 7:37 PM1 / 5आत्ताच्या काळात सर्वच घरात स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरला जातो. गॅस वापरण्यासाठी सरकारकडूनही अनेक योजना आणल्या जातात. मात्र आपण वापरत असलेल्या गॅस सिलेंडरबाबत तुम्हाला या गोष्टी माहीत आहे का? आपल्या घरातील गॅसचा रंग लाल आणि त्याचा आकार दंडगोल असतो ते कशासाठी?2 / 5एलपीजी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलिंडरचा रंग बहुतेक वेळा लाल असतो आणि त्याचा आकार दंडगोल असतो असे दिसते. या मागे काही कारणे आहेत. एलपीजी हा रंगरहित आणि वासरहित गॅस आहे मात्र घरात सिलिंडर बदलताना चटकन लक्षात येथे की या गॅसला एक ठराविक वास येतो. त्याचे कारण म्हणजे एलपीजी अतिशय ज्वालाग्राही आहे 3 / 5सिलिंडर मधून गॅस लिक होत असेल तर दुर्घटना घडण्याची शक्यता मोठी असते यामुळे या वायूत इथील मर्सेटेन मिसळले जाते आणि आपल्याला जो उग्र वास येतो तो या एथाईलचा असतो. त्यामुळे गॅस सिलिंडर मधून गळत असेल तर ताबडतोब कळते आणि वेळीच गॅस गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करता येतात.4 / 5दुसरे म्हणजे हे सिलिंडर दंडगोल आकाराचे असतात. याचे कारण असे की, यामुळे गॅस सिलिंडर वाहतूक करत असताना एकमेकांवर ठेवले गेले तरी सिलिंडरवर एकसारखा दाब पडतो. घरगुती वापराच्या सिलिंडरचा रंग सर्वसामान्यपणे लाल असतो तर व्यावसायिक सिलिंडर निळ्या रंगाचा असतो. धोका दर्शविण्यासाठी लाल रंग वापरला जातो. 5 / 5दुसरे म्हणजे हे सिलिंडर दंडगोल आकाराचे असतात. याचे कारण असे की, यामुळे गॅस सिलिंडर वाहतूक करत असताना एकमेकांवर ठेवले गेले तरी सिलिंडरवर एकसारखा दाब पडतो. घरगुती वापराच्या सिलिंडरचा रंग सर्वसामान्यपणे लाल असतो तर व्यावसायिक सिलिंडर निळ्या रंगाचा असतो. धोका दर्शविण्यासाठी लाल रंग वापरला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications