शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lake of No Return: थरारक! भारतातील रहस्यमयी तलाव, जो गेला तो परत आलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 1:00 PM

1 / 7
तुम्ही कधी अशा रहस्यमयी तलावाबाबत ऐकलेय, जिथे एखादा व्यक्ती गेला तो कधी परत आलाच नाही. असा एक तलाव भारत आणि म्यानमारच्या सीमेवर अस्तित्वात आहे. या तलावाला ‘लेक ऑफ नो रिटर्न’ या नावाने ओळखले जाते.
2 / 7
काही रहस्यमयी घटनांमुळे हा तलाव नेहमी चर्चेचा विषय असतो. असेही सांगितले जाते या तलावाकडे जो कोणी गेला तो कधीच परत आला नाही. (Lake of No Return: The Mysterious Lake Of India No One Has Ever Escaped)
3 / 7
या रहस्यमयी तलावाच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या तलावाला नावांग यांग (Nawang Yang lake) असेही म्हटले जाते. हा तलाव अरुणाल प्रदेशमध्ये आहे. दुसऱ्या विश्वयुद्धावेळी अमेरिकेच्या पायलटांनी त्यांचे विमान इथे सपाट जमीन असेल असे समजून आपत्कालीन लँडिंग केले होते. मात्र, त्यानंतर ते जहाज आणि पायलटांसह रहस्यमयरित्या गायब झाले होते.
4 / 7
युद्ध संपल्यानंतर जपानी सैन्य या रस्त्याने तलावाक़डून परत जात होते. ते देखील या तलावाजवळ येऊन रस्ता चुकले आणि गायब झाले. काही लोकांनुसार त्यांना मलेरिया झाला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त इंडिया टाईम्सने दिले आहे.
5 / 7
या तलावाच्या आजुबाजुला जे गाववाले आहेत ते देखील एक कहाणी सांगतात. अनेक वर्षांपूर्वी एका गाववाल्याने मोठा मासा पकडला होता. त्याने त्याच्या गावातील सर्वांना जेवायला बोलावले.
6 / 7
फक्त त्याची आजी आणि नातीला त्याने बोलावले नव्हते. यामुळे त्या गावच्या मुखियाने त्या म्हातारीला आणि नातीला या गावापासून दूर जाण्यात सांगितले. पुढच्याच दिवशी संपूर्ण गाव त्या तलावाचा हिस्सा बनला.
7 / 7
आजवर या तलावाचे रह्स शोधण्याचे कित्येक प्रयत्न झाले, परंतू आतापर्यंत काहीच हाती लागलेले नाही. तलावावर जाताच परत न येण्याची कहाणी असल्याने भीतीनेदेखील या तलावाकडे लोक जात नाहीत. काही जण धाडस करून जातात.
टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेश