Lockdown in the country again from December 1 due to corona?; Know the truth of viral massage
Lockdown: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे १ डिसेंबरपासून देशात पुन्हा लॉकडाऊन?; जाणून घ्या सत्य By प्रविण मरगळे | Published: November 13, 2020 4:25 PM1 / 10चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे गेल्या ८ महिन्यापासून संपूर्ण जगावर संकट उभं राहिलं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, मात्र आता हळूहळू सगळीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. 2 / 10देशात लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या, कंपन्या बंद पडल्या, वाहतूक थांबली, केवळ पोलीस, डॉक्टर्स आणि नर्स यांचे काम सुरु होतं, बाकी सगळ्यांना घरीच राहावं लागत होतं, 3 / 10सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आली आहे. 4 / 10युरोपियन देशांमध्ये कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सध्या ज्या प्रयोगशाळा कार्यरत आहे त्या दिलेल्या सूचनांप्रमाणे सक्षमपणे कार्यरत ठेवाव्यात. फ्लूसदृश आजाराचे नियमित सर्वेक्षण करावे, त्यासाठी गृहभेटी आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा 5 / 10सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील कोविडचे रुग्ण सध्या कमी होत आहेत. अशा परिस्थितीत कोविड आणि नॉन कोविड रुग्णसेवेचा पुरेसा ताळमेळ ठेवण्यासाठी आणि जनतेला सर्वप्रकारच्या रुग्णसेवा सुरळीतरित्या मिळण्याकरिता रुग्ण उपचार व्यवस्थेसंदर्भात नियोजन करावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. 6 / 10सणासुदीच्या दिवसात बाजारात गर्दी वाढल्याने कोरोना पसरण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फ्रान्स, स्पेनसारख्या शहरांनी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यातच भारतातही १ डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे असा मेसेज व्हायरल होत आहे. 7 / 10सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज बनावट असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आढळून आलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचा दावा मेसेजमध्ये केला होता. 8 / 10मात्र अशाप्रकारे कोणतेही खोटे मेसेज व्हायरल करताना सावधानता बाळगा, भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नाही असं पीआयबीनं म्हटलं आहे. 9 / 10अमेरिकेमध्ये १ कोटी पाच लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६६ लाख रुग्ण बरे झाले आहेत. युरोपमध्ये सर्वाधिक रुग्ण फ्रान्समध्ये आहेत. त्यानंतर स्पेन, इंग्लंड, इटली, जर्मनी आदी देशांचा क्रमांक लागतो.10 / 10दरम्यान, जगभरासह देशात कोरोना लसीची साठवणूक आणि वितरण यांवर वेगाने काम सरू आहे. भारतातही केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार अनेक राज्यात लसीच्या वितरणासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. सगळ्यात आधी लस ही आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना दिली जाणार असून त्यासाठी यादी तयार करण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications