Man finds autographs of gandhi nehru ambedkar in grandfathers unseen notebook
अरे व्वा! साफसफाई करताना मिळाली नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी असलेली आजोबांची डायरी; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:33 PM1 / 5घराची साफसफाई करताना आपल्या अनपेक्षितपणे अनेक जुन्या गोष्टी मिळतात. ज्या आपल्याला हव्याहव्याश्या वाटत असतात. अशीच एक गमतीदार घटना घडली आहे. एक माणूस आपल्या आईसोबत घरात साफसफाई करत होता. साफसफाई करत असताना या माणसाला एक अशी डायरी मिळाली. जी पाहून तो अवाक् झाला. कारण या डायरीत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी व्ही रमन यांची हस्ताक्षरं होती.2 / 5विजय बसरुर नावाच्या एका माणसाने या स्वाक्षऱ्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले असून त्यासोबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, 'काही दिवसांपूर्वी आईसोबत घरात साफसफाई करत होतो. त्यावेळी असं काहीतरी भेटलं ज्याबाबत गेल्या ३० वर्षांपासून मला कल्पनाही नव्हती. मला आजोबांचं ऑटोग्राफ बूक सापडलं, आणि त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्या सह्या आहेत', असं म्हटलं आहे.3 / 5या व्यतिरिक्त विजयने त्या हस्ताक्षरांचासुद्धा फोटो पोस्ट केला आहे. ज्यांच्यावर तारीखसुद्धा लिहिलेली आहे. पानं पाहून खूप जुनी कागदं असल्याचे दिसून येतं. अजूनही या कागदांना अगदी व्यवस्थित ठेवण्यात आलं होतं. 4 / 5या पोस्टमधील फोटोंमध्ये सरळ दिसून येत आहे की महात्मा गांधींचे हस्ताक्षर १९३८ चे आहे. नेहरूंचे हस्ताक्षर १९३७ मधील आहे. आंबेडकरांचे हस्ताक्षर १४९८ चे आहे. सी व्ही रमन यांच्या हस्ताक्षरावर तारीख लिहिलेली नाही. 5 / 5सोशल मीडियावर या हस्ताक्षरांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून अनेक युजर्सकडून, 'सर्व स्वाक्षऱ्या मौल्यवान आहेत, हा अनमोल ठेवा व्यवस्थित जतन करून ठेवा अशा कमेंट्स येत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications