Man from uk online orders apples and gets apples mobile iphone
याला म्हणतात नशीब! ऑनलाईन मागवले Apple अन् डिलिव्हरी बॉय घेऊन आला आयफोन By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 8:08 PM1 / 8ऑनलाईन मागवलं काय आणि डिलिव्हर भलतंच काहीतरी झालं. ऑनलाईन शॉपिंगदरम्यान अशा अनेक घटना घडत असतात. तुम्हालासुद्धा कधी ना कधी असा अनुभव नक्कीच आला असेल. 2 / 8काहीजण तर अशा प्रकारामुळे ऑनलाईन शॉपिंग करणंच सोडून देतात. अशीच एक मजेशीर घटना समोर येत आहे.3 / 8या माणसानं अॅपल मागवले होते आणि चक्क अॅपलचा फोन म्हणजे आयफोन त्याला मिळाला . 4 / 8यूकेतील 50 वर्षांचा निक जेम्स त्याने ऑनलाईन सफरचंद (Apple) मागवले होते. त्याने दिलेल्या ऑनलाइन ऑर्डरची डिलिव्हरी त्याला मिळाली. त्याने पार्सल खोललं आणि त्याला मोठा धक्काच बसला. 5 / 8द मिररशी बोलताना निकनं सांगितलं की, ''मला वाटलं की हा कदाचित प्रँक असावा. कुणीतरी माझी मस्करी करत असावं पण तसं काहीच नाही. मला खरोखरच सफरचंदांसोबत आयफोन फ्री मिळाला होता.''6 / 8रिपोर्टनुसार निकने टस्को ग्रोसरी शॉपमधून सफरचंद मागवले होते आणि हा या शॉपच्या प्रमोशन कॅम्पेनचा हा एक भाग होता7 / 8टेस्कोमार्फत सुपर सब्स्टिट्युट ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये लकी कस्टमरला आयफोन, एअरपॉड्स आणि अशाच इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्री म्हणून दिल्या जात आहेत. 8 / 8विजेत्यांमध्ये निकसुद्धा लकी कस्टमर ठरला.असं नेहमीच होतं असं नाही. याआधी तर चीनमधील एका महिलेने खरंच आयफोन ऑर्डर केला होता आणि त्याऐवजी तिला अॅपल ड्रिंक मिळालं होतं. अशा विचित्र घटना अनेकांसोबत झाल्या आहेत.. आणखी वाचा Subscribe to Notifications