By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 09:32 IST
1 / 7मराठी वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ आपण शालेय शिक्षणात शिकलो आहोत. मराठीच्या परीक्षेत वाक्यप्रचारांचे अर्थ सांगा यासाठी १० ते १५ गुणांचा प्रश्न असतो. पण मराठी वाक्यप्रचारांचे आगळेवेगळे आणि तितक्याच धम्माल अर्थाचे मिम्स सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 2 / 7बुचकळ्यात पडणे याचा अर्थ गोंधळणे, पेचात पडणे, समजेनासे होणे, काय करावे ते न कळणे असा होतो हे आपल्याला माहित्येय. पण प्लास्टिकचं बुच, कळ्यांमध्ये पडलेलं हे मिम कल्पनेला तोड नाही याचीच प्रचिती देतं. 3 / 7एखाद्याला जेरीस आणणं म्हणजे काय असतं हे तुम्ही आजवर अनुभवलं असेलच. पण टॉम अँड जेरीमधल्या 'जेरी'स आणणे असं हे भन्नाट मिम पाहून तुम्हीही जेरीस आला नाहीत ना?4 / 7'नमक हलाल' चित्रपटातील 'आज रपट जायें तो' या गाण्यातील अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या रोमँटिक सीनवरुन मराठी वाक्यप्रचाराचं असं हे मिम तयार होईल असा विचार करणं म्हणजेच खरंच नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला साष्टांग दंडवतच करायला हवं नाही का?5 / 7कंठाशी 'प्राण' येणे...6 / 7बुचकळ्यात पडणे, जेरीस आणणेच्या अभूतपूर्व यशानंतर नाकी 'नऊ' येणे...7 / 7या मिमला काही कॅप्शन देण्याची खरंच गरज आहे का?.... हातावर 'तुरी' देणे!