By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:26 IST
1 / 10पृथ्वी शॉने मारहाण केली असल्याचा आरोप करणारी मॉडेल सपना गिल सध्या चर्चेत आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने पांढरा ड्रेस आणि रंगीबेरंगी बॉर्डर असलेल्या मिनी स्कर्टमध्ये तिचा सुंदर लूक शेअर केला आहे.2 / 10जामिनावर बाहेर आल्यानंतर सपनाने पहिल्यांदाच चाहत्यांना तिची झलक दाखवली आहे. नवीन फोटो शेअर करून अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जे मला दाखवायला भाग पाडतात त्यांच्यासाठी माझी वृत्ती अशी आहे.' 3 / 10तुरूंगातून बाहेर आल्यानंतर सपना गिलने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांविरुद्ध मुंबई एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. तिने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.4 / 10सपना गिलने कलम 154, 326A, 326B, 354, 354B, 370, 370A, 376DB, 376E, 509 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्यावर आणि तिच्या मित्रांवर लावण्यात आलेल्या आरोपांवरही खुलासा केला आहे. 5 / 10सपनाने एफआयआर नोंदवण्याची मागणी करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मागील आठवड्यात मुंबईतील हॉटेलमध्ये सेल्फी घेण्यावरून झालेल्या भांडणानंतर शॉवरील हल्ल्याप्रकरणी सपना गिल आणि इतर काहींना अटक करण्यात आली होती. सोमवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सपना गिलला जामीन मंजूर केला.6 / 10जामिनावर बाहेर आल्यानंतर सपना गिलने म्हटले, 'आम्ही कोणाला मारहाण केली नाही, ना पैसे मागितले. ना सेल्फीची मागणी केली. आम्ही आमच्या मित्रांसोबत मजा करत होतो. पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र माझ्या मित्राला मारहाण करत होते. मी त्याला वाचवायला गेले असता त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला.'7 / 1026 वर्षीय सपना गिलचा जन्म 1991 मध्ये पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये झाला, मात्र ती भोजपुरी सिनेमांद्वारे आपली ओळख निर्माण करत आहे. 8 / 10खरं तर पृथ्वी शॉ सोबतच्या वादापूर्वी सपना गिलला फारसे लोक ओळखत नव्हते. मात्र, पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे तिची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. पृथ्वी शॉमुळे सपना गिलचे फॉलोअर्स देखील वाढले आहेत.9 / 10सपना गिलने अलीकडेच पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 'पृथ्वी शॉमुळे प्रसिद्धी मिळाली आहे', अशा आशयाची एकाने कमेंट केली आहे.10 / 10तर काही चाहत्यांनी पृथ्वीचे समर्थन करत तिच्यावर आरोप केले आहेत. प्रसिद्धीसाठी क्रिकेटरसोबत वाद केला असल्याचा आरोप पृथ्वीच्या चाहत्यांनी केला आहे.