modi government deposit rs 7 lakh in student account under jeevan lakshya scheme pib fact check
Fact Check : मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करतंय ७ लाख रुपये?; जाणून घ्या सत्य By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 7:52 PM1 / 92 / 9लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. लाखो लोकांच्या पगारात कपात करण्यात आली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं.3 / 9कोरोनामुळे घसरलेला अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅकेजची घोषणा केली.4 / 9देशातल्या विविध घटकांना, आर्थिक क्षेत्रांना मदत देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दिलासा देण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे.5 / 9एकीकडे सरकार अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.6 / 9केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात ७ लाख रुपये जमा करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.7 / 9मोदी सरकार 'जीवन लक्ष्य योजने'च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ७ लाख रुपयांची मदत देत असल्याचं दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.8 / 9व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता तो खोटा असल्याची माहिती समोर आली. पीआयबीनं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.9 / 9नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून दूर राहावं, जागरूकता बाळगून अशा बातम्या फॉरवर्ड करू नयेत, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications