शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देख रहा है ना बिनोद…नितीश कुमारांनी खुर्चीसाठी पुन्हा गेम केला!, मिम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 2:09 PM

1 / 9
नितीश कुमार यांनी पक्षाच्या बैठकीत भाजपाची साथ सोडण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आणि आज संध्याकाळी पाच वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार राजदसोबत सत्ता स्थापन करण्याची माहिती समोर येताच सोशल मीडियातही याचे पडसाद उमटू लागले आहेत.
2 / 9
राजकारण असो, मनोरंजन असो किंवा मग क्रिडा प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर सोशल मीडियात एकापेक्षा एक मिम्स व्हायरल होत असतात. नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला तोड नसते. अशी अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली असतील. आता नितीश कुमारांच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे.
3 / 9
नितीश कुमार यांच्याबाबतचे अनेक मिम्स सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत असून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी नितीश कुमार कोणत्याही क्षणी आपली भूमिका बदलू शकतात अशा अर्थाचे मिम्स व्हायरल होत आहेत.
4 / 9
अगदी ९० च्या दशकापासून जदयू आणि भाजपा हातात हात घालून बिहारमध्ये काम करत असताना यावेळी अग्निपथ योजना, जातिगणना, लोकसंख्या कायदा आणि लाऊडस्पीकरवर बंदी यासारख्या अलीकडील अनेक मुद्द्यांवर जेडीयू-भाजप खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय भाजपाच्या अनेक सभांपासून नितीश कुमार दूर राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजपा-जदयूच्या युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
5 / 9
असो. बिहारमधील राजकीय उलथापालथीवर ट्विटरवर नेटिझन्स मात्र चांगलीच टर उडवताना दिसत आहेत. खासकरुन नितीश कुमार नेटिझन्सच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. नितीश कुमार यांनी सत्तेसाठी बिहारमध्ये पुन्हा एकदा 'खेला' केला अशा भावना नेटिझन्सनं व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी नितीश कुमार यांच्या बाजूनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
6 / 9
अभिनेता अजय देवगणच्या 'फूल और काँटे' चित्रपटातील सीन असो किंवा मग जेठालालचे मीम्स असोत. विविध पद्धतीचे मिम्स बिहारच्या राजकीय परिस्थितीवर तयार करण्यात आले आहेत. नेटिझन्सही या मिम्सवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
7 / 9
नितीश कुमार यांना मोदींच्या 'मन की बात' कळाली म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला नाहीतर बिहारमध्येही एकनाथ शिंदे पार्ट-२ पाहायला मिळाला असता, अशीही प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत. तर कधी यूपीए तर कधी एनडीए...जिथं सत्ता तिथं आपण अशी नितीश कुमार यांची भूमिका असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
8 / 9
भाजपासोबत राहू, राजद सोबत जाऊ की सोनिया गांधींशी बोलू? मला फक्त मुख्यमंत्रीपद हवं, अशा आशयाचेही मिम्स व्हायरल होत आहेत. काहींनी तर नितीश कुमार २०२४ साली पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहात आहेत, म्हणूनच त्यांनी भाजपाशी काडीमोड घेतलाय असंही म्हटलं आहे.
9 / 9
भाजपासोबत राहू, राजद सोबत जाऊ की सोनिया गांधींशी बोलू? मला फक्त मुख्यमंत्रीपद हवं, अशा आशयाचेही मिम्स व्हायरल होत आहेत. काहींनी तर नितीश कुमार २०२४ साली पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहात आहेत, म्हणूनच त्यांनी भाजपाशी काडीमोड घेतलाय असंही म्हटलं आहे.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार