शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिलदार Xiaomi! नव्या मोबाईलशिवाय बोहल्यावर चढणार नाही, नवरदेवाचा हट्ट कंपनीने पूर्ण केला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 6:52 PM

1 / 10
भारतात नवरदेवाचे लाड काही कमी नाहीत. बोहल्यावर चढण्याआधी मला चेनच हवी, ब्रेसलेटच हवे नाहीतर स्पोर्ट बाईकच हवी अशा एका ना अनेक अटी ठेवल्या जातात. हा एक हुंड्याचाच प्रकार असल्याने कायद्याने त्याला बंदीही आहे.
2 / 10
मुलीकडचे लग्न मोडू नये, बदनामी होऊ नये किंवा हातचे चांगले स्थळ जाऊ नये अशा अनेक कारणांनी हे हट्टही पूर्ण करतात. काहीवेळी नववधू या नवरदेवांना भर मांडवात चांगला इंगाही दाखवतात. परंतू आजचा हा किस्सा फार वेगळा आहे.
3 / 10
उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने सोशल मीडियावर भन्नाट पोस्ट टाकली. ''मला जोपर्यंत नवीन स्मार्टफोन देत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही'', असे तो म्हणाला.
4 / 10
या तरुणाचे हे ट्विट खूप व्हायरल झाले. एवढे की त्या मोबाईल निर्माता कंपनीने त्याला थेट मोबाईल फुकट पाठवून दिला.
5 / 10
खतरनाक गोष्ट म्हणजे त्याला असा तसा मोबाईल नाही, तर नुकताच लाँच झालेला शाओमीचा (Xiaomi) सर्वात महागडा आणि ५जी एमआय १० टी प्रो हा फोन त्याच्या हातात होता.
6 / 10
हा या कंपनीचा प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न असेल किंवा आणखी काही म्हणा. पण या तरुणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
7 / 10
उत्तर प्रदेशच्या कमल अहमदने हे ट्विट केले होते. त्याने ट्विटमध्ये थेट Mi 10T Pro चे नाव लिहिले होते. कंपनीने अहमदला तो फोन गिफ्ट केल्यानंतर त्याने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने ''अखेर...तो मॉन्स्टर मिळालाच'' कॅप्शन लिहिले आहे.
8 / 10
यावर शाओमी इंडियाचे व्हाईस प्रेसिडंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार यांनी त्याला रिप्लाय दिला आहे. ''हाहा! मला वाटते तुम्ही आता लग्नासाठी तयार झाले असाल''
9 / 10
आता या नवरदेवाने पुढे जाऊन लग्न केले की नाही ते समजले नाही.
10 / 10
यावर अहमदनेही मनु कुमार यांना थेट लग्नाचे निमंत्रण देऊन टाकले. त्यात मी या फोनसोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी शाओमी किंवा मनु कुमार यांच्याकडे हुंडादेखील मागणार नाही असे मजेशीर उत्तर देऊन टाकले आहे.
टॅग्स :marriageलग्नxiaomiशाओमी