शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

“एकट्या पुरुषांना बाहेर फिरण्यास बंदी आणावी, कारण...”; बेनजीर भुट्टोच्या मुलीची भलतीच मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 2:55 PM

1 / 10
पाकिस्तानमध्ये (Pakistan) महिलांच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी (Asif Ali Zardari) यांच्या मुलीनं बख्तावर भुट्टो जरदारी(Bakhtawar Bhutto Zardari) यांनी एक पर्याय दिला आहे.
2 / 10
बख्तावर भुट्टो म्हणतात की, पाकिस्तानात पुरुषांना एकटं सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून बंदी आणली पाहिजे. बख्तावर यांच्या या विधानाला महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबोधित केले जाते.
3 / 10
बेनजीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर यांनी सांगितले की, पुरुषांना एकटं कुठल्याही सार्वजनिक जागेवर जाण्याची परवानगी तेव्हाच असेल जेव्हा त्याच्यासोबत आई, बहिण किंवा पत्नी असेल. भुट्टो यांचे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
4 / 10
बख्तावर भुट्टो यांनी केलेल्या विधानावरुन नेटिझन्सनं अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी बख्तावर यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यानंतर बख्तावर यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
5 / 10
भुट्टो यांनी ट्विटरवर सांगितलंय की, महिलांविरोधात वाढणारे हिंसाचार आणि छेडछाडीच्या घटनामुळे त्यांनी अशाप्रकारे विधान केले आहे. यापेक्षा वेगळा रस्ता असू शकत नाही असं मला वाटतं. जेव्हा पुरुषांसोबत एखादी महिला असेल तर तो महिलेची छेड काढण्याबाबत दोनदा विचार करेल.
6 / 10
१४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनावेळी लाहौरच्या ग्रेट इकबाल पार्क येथे एक महिला यूट्यूबरसोबत अश्लिल वर्तवणूक केल्याचं समोर आलं होतं. पाकिस्तानी अखबार डॉननुसार, तक्रारकर्त्या महिलेने मीनार ए पाकिस्तानवर व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर शेकडो लोकांनी तिच्यावर हल्ला केला.
7 / 10
या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोशल मीडियावर यावरुन चर्चा झाली. भुट्टो यांनी मीनार ए पाकिस्तान घटनेवर प्रतिक्रिया दिली. ही खूप भयानक घटना होती मुख्य म्हणजे पोलिसांसमोर ही घटना घडली हे दुर्देवी आहे.
8 / 10
त्या पुढे म्हणाल्या की, पोलीस या प्रकरणात मदत करण्याऐवजी बॅकअप बोलवू शकत होते, काहीच नाही तर गर्दी पांगवण्यासाठी हत्याराचा वापर करू शकले असते. मला वाटतं महिला सुरक्षेवरुन सरकारमध्ये संवेदनशीलता कमी आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांनीच पुढे यायला हवं
9 / 10
मागील काही काळात पाकिस्तानात महिलांच्याविरोधात गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर आणि पत्रकार साबिन आघाने यांनीही ट्विटरवर शेअर केले होते की, मीनार ए पाकिस्तानसारखी घटना भयानक आहे. काही वर्षापूर्वी माझ्यासोबतही हे घडलं होतं.
10 / 10
बख्तावर भुट्टो यांनी केलेल्या विधानामुळे केवळ पाकिस्तानातच नव्हे तर इतर देशातील नेटिझन्सही प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. सार्वजनिक ठिकाणी एकट्या पुरुषांना जाणं बंदी केल्यानं महिलांवरील अत्याचार कमी होतील का? यावर सोशल मीडियात चर्चा सुरु झाली आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तान